Description
“मला हवं ते मिळविण्यासाठी
मला सर्वप्रथम संपत्ती कशी मिळवतात
याचा अभ्यास करावा लागेल,
त्यासाठी वेळ द्यावा लागेल.”
जॉर्ज सॅम्युएल क्लॅसन यांचा जन्म 7 नोव्हेंबर, 1874 मध्ये मिझौरी येथील लुवीझियाना येथे झाला.
नेब्रास्का विश्वविद्यालयात त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि स्पॅनिश-अमेरिकन युद्धात, ते अमेरिकन आर्मीमध्ये नोकरी करून सहभागी झाले होते.
त्यांच्या प्रदीर्घ प्रकाशन व्यवसायाची सुरुवात त्यांनी डेन्व्हर कॉलरेडो येथे क्लॅसन मॅप कंपनी या प्रकाशन संस्थेची स्थापना करून केली.
अमेरिका आणि कॅनडा या देशांच्या रस्त्यांच्या नकाशाचे पहिले पुस्तक प्रकाशित करून त्यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा केला.
1926 मध्ये त्यांनी काटकसर आणि आर्थिक यश यासंदर्भातील एक पत्रकांची मालिका प्रकाशित केली आणि अल्पावधीतच ती अत्यंत प्रसिद्ध झाली, त्यातील प्रत्येक मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यांनी पौराणिक शहर बॅबीलॉनमधील नीतिकथेचा आधार घेतला.
बँका आणि विमा कंपन्यांनी त्यांच्या पत्रकांचे मोठ्या प्रमाणात वितरण केले, त्यामुळे जॉर्ज क्लॅसन हे नाव लाखो लोकांना परिचित झाले. प्रस्तुत पुस्तकाचे शीर्षक
असलेले ‘बॅबीलॉनचा धनाढ्य’ हे त्या अनेक प्रसिद्ध पत्रकांपैकी सर्वांत लोकप्रिय बोधकथेचे पुस्तक आहे.
‘बॅबीलॉनच्या नीतिकथा’ या आजच्या काळातही अत्यंत प्रेरणादायक आणि श्रेष्ठ कथा ठरल्या आहेत.
————————————————————————————————————————
या पुस्तकात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून एखादा माणूस खरोखरच श्रीमंत होत असेल, तर तो माझ्या म्हणण्याचा खराखुरा पुरावा आहे.
एका विशिष्ट पद्धतीने काम करून लोक श्रीमंत होऊ शकतात, हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे.
अर्थात त्यासाठी सर्व लोक याच पद्धतीने विचार करायला लायक असणे आवश्यक आहे.
आम्ही दुसरी गोष्ट ही सांगत आहोत की, हे पुस्तक श्रीमंत होण्याचे सूत्रे सांगणारे आहे. यातील सूत्रे एखाद्या व्यक्तीने आत्मसात केली तर ती व्यक्ती निश्चितरूपाने श्रीमंत होऊ शकते; पण त्यासाठी व्यक्तीला ही सूत्रे पूर्णपणे समजावून घ्यावी लागतील, आत्मसात करावी लागतील.
विचार करण्याची शास्त्रीय पद्धत एकच असून ती ही आहे की, ध्येयाच्या दिशेने स्पष्ट आणि स्वच्छ पद्धतीने पुढे जाणे. याहून लहान आणि स्पष्ट अशी पद्धत आतापर्यंत कोणीही सांगितलेली नाही. श्रीमंत होण्याची अशी सोपी आणि सुटसुटीत पद्धत या पुस्तकात सांगितलेली आहे.
अनावश्यक आणि निरुपयोगी असलेल्या सर्व बाबींची आम्ही इथे काटछाट केली आहे. जेव्हा केव्हा तुम्ही या विषयावर चर्चा कराल तेव्हा बाकीच्या सर्व गोष्टी एकत्र करून बाजूला ठेवा आणि आपल्या डोक्यातून बाहेर काढून टाका.
फक्त याच पुस्तकात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करा आणि श्रीमंत व्हा!
या जगात प्रत्येकजण श्रीमंत होण्यासाठीच जन्माला आला आहे.
म्हणून तुम्हीही श्रीमंत व्हा आणि श्रीमंतीचे सुख उपभोगा.
Reviews
There are no reviews yet.