Tyagmurti Mata Ramai | Gulamgiri | त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर | गुलामगिरी |

₹350

248 Pages
AUTHOR :- Vijay Shivram Gavare
AUTHOR :- Jotirao Phule
ISBN :- 9789371180696

Share On :

Description

त्या मातेनं तरी किती दुःख सोसायचं. भीमा विलायतेला होता तेव्हा तिनं रात्रंदिवस प्रपंचाची काळजी वाहिली. त्याची वकिली सुरू होईपर्यंतसुद्धा शेणाचा भार डोक्यावर वाहायला तिला कमीपणा वाटला नाही. दारोदार शेणाच्या गोवर्‍या विकायलाही ती लाजली नाही. थकली नाही, दमली नाही. स्वत: वाट्टेल तेवढे कष्ट उपसत राहिली. कधी पोटभर जेवली नाही. कुटुंबासाठीच कष्ट करीत राहिली. अशा या ममताळू, सुशील व पूज्य मातेच्या वाट्याला तरी असं अघोरी दुःख यायला नको होतं. देव तरी किती दुष्ट. अशाच पुण्यवान माणसांच्या पाठीशी लागतो. त्यांच्यासमोर दुःखाचे डोंगर उभे करतो. या देवाला देव तरी का म्हणावं आणि कसं म्हणावं? जो त्याला मनापासून मान देतो, त्याचाच तो घास घेतो. मग देव आहे की देव नावाचं थोतांड?
दुःखाअंती सुख असते, असे म्हणतात; पण आंबेडकर घराण्याला मात्र दुःखच दुःख सोसावे लागत होते. यानंतर कितीही सुख मिळाले तरी सोसलेल्या दुःखाची किंचितही भरपाई होणार नव्हती. झालेली हानी भरून निघणार नव्हती. काहींच्या दुःखाला निदान सीमा तरी असतात; पण या घराण्याच्या दुःखाला सीमाच नव्हती. त्यांचे दुःख म्हणजे अथांग समुद्र होता. त्यांच्या दुःखाने आकाशसुद्धा भरून गेले तरीही त्यांचे दुःख उरतच राहिले. या दुःखाच्या मागे समाजव्यवस्थेचा, आर्थिक विवंचनेचा वणवा होता; तरीही ध्येयवादाची महत्त्वाकांक्षा होती.
कष्टाअंती विश्रांती हवी असते; पण तीही या कुटुंबाला नव्हती. अविश्रांत कष्ट करूनही पोटातील भुकेचा वणवा शमविता येत नव्हता. कच्चीबच्ची मुले भुकेने व्याकूळ होत होती. औषधपाण्याविना गंगाधरसारखं लाडकं बाळ मरणाच्या दारी गेलं. आई – बापाचं हृदय किती विदीर्ण झाले असेल, चाळणीच्या छिद्रांसारखे.

या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे कीं, आज शेंकडों वर्षे शूद्रादि अतिशूद्र, ब्राह्मण लोकांचें राज्य झाल्यापासून सतत दुःखें सोशीत आहेत व नानाप्रकारच्या यातनेंत आणि संकटांत दिवस काढीत आहेत, तर या गोष्टीकडे त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनीं तिजविषयीं नीट विचार करणें व येथून पुढें भटब्राह्मण लोकांचें अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणें हाच काय तो आहे.
ते लोक परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यांस अनेक तऱ्हेचीं क्रूर शासनें दिलीं. पुढे कांहीं काळानंतर त्या लोकांस या गोष्टीचें विस्मरण झालेसें पाहून भट लोकांनी परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे लोकांस जिंकून त्यांस दास केल्याचें मुळींच छपवून ठेविलें. त्या लोकांनी आपली वजनदारी ह्या लोकांचे मनावर बसवावी याजकरितां जेणेकरून आपले मात्र हित होईल असे नानाप्रकारचे उपाय योजले व ते सर्व सिद्धीस जात गेले.
इंग्रज लोकांनी तर पुष्कळ ठिकाणीं इतिहास वगैरे ग्रंथांत भट लोकांनी स्वहितास्तव इतर लोक, म्हणजे, शूद्रादि अतिशूद्र लोक ह्यांस आपले गुलाम करून टाकिलें आहे, असें संमत दिलेलेंच आहे.
या देशात इंग्रज सरकार आल्यामुळें शूद्रादि अतिशूद्र भटाच्या कायिक दास्यत्वापासून मुक्त झाले खरे, परंतु आम्हांस सांगण्यास मोठें दुःख वाटतें कीं, अद्यापि आमचे दयाळू सरकारचे शूद्रादि अतिशूद्रांस विद्या देण्याविषयीं दुर्लक्ष असल्यामुळें ते अज्ञानी राहून भट लोकांचे बनावट ग्रंथांच्या संबंधानें त्यांचे मानसिक दास झालेले आहेत व त्यांस सरकारजवळ दाद मागण्याचें त्राण राहिलें नाहीं. भट लोक त्या सर्वांस प्रापंचिक सरकारी कामांत किती लुटून खातात, याजकडेस आमचे सरकारचें मुळींच लक्ष पोंहचलें नाहीं, तर त्यांनीं दयाळू होऊन या गोष्टीकडेस नीट रीतीनें लक्ष पुरवावें व त्यांस भट लोकांचे मानसिक दास्यत्वापासून मुक्त करावें अशी आम्हीं आपले जगन्नियंत्याजवळ शेवटली प्रार्थना करितों.”
१ जून १८७३
जो. गो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Tyagmurti Mata Ramai | Gulamgiri | त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर | गुलामगिरी |”

Your email address will not be published. Required fields are marked *