fbpx

Vitamins | व्हिटॅमिन्स

₹350

448Pages
AUTHOR :- Achyut Godbole; Vaidehi Limaye
ISBN :- 9789352201938

Share On :

Description

‘व्हिटॅमिन्स’ हे पुस्तक संशोधनावर आधारित, अत्यंत अभ्यासपूर्ण व विषयाची सर्वांग ओळख करून देणारे आहे.
कोणत्याही विषयाला मुळापासून भिडून सर्वसाधारण अनभिज्ञ वाचकांसाठी ते सहज सोपे करून मांडणे हे अच्युत गोडबोले व डॉ. वैदेही लिमये यांचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक हिटॅमिनच्या संशोधनाचा इतिहासः तसेच त्याची आजच्या युगातील उपयुक्तता व त्या संबंधित विवेचन वैद्यकीय व्यावसायिकांसही वाचनीय आहे.
प्रवाही व रसाळ भाषेमुळे हे पुस्तक सामान्य वाचकाला खिळवून ठेवते. या पुस्तकासाठी अनेक शुभेच्छा!
– डॉ. अविनाश सुपे
‘व्हिटॅमिन्स’सारखा अवघड पण तितकाच गंभीर आणि महत्त्वाचा विषय हाताळणं हे सोपं काम नव्हे. व्यासंगी लेखक अच्युत गोडबोले व डॉ. वैदेही लिमये या दोघांनीही एखाद्या कसलेल्या गायकाच्या कंठातून सहज सुरेल तान निघावी तसा हा विषय शास्त्रीय अभ्यासपूर्ण तरीही रंजक रीतीने मांडला आहे. व्हिटॅमिन्सच्या शोधांच्या कथा, त्यांच्या शोधात आलेले अडथळे, संशोधकांच्या हालअपेष्टा आणि त्यातून त्यांनी मिळवलेते यश यांचा वाचनीय आलेख या लेखकद्वयींनी मांडला आहे.
-डॉ. विजय आजगावकर
सुप्रसिद्ध मधुमेहतज्ञ आणि लेखक
संशोधनात वापरण्यात येणाऱ्या सर्व शास्त्रीय पद्धतींचा या पुस्तकात मागोवा घेण्यात आला आहे. पाश्चिमात्य व भारतीय परंपरा यांचे दाखले दिल्यामुळे हे लिखाण आकर्षक झाले आहे. पोषण, आहार व निकृष्ट शरीर यांचा संबंधही प्रस्तुत पुस्तकातील विविध प्रयोगांमुळे सिद्ध झालेला दिसून येतो. आहारातील प्रत्येक व्हिटॅमिन्सचे कोणते पदार्थ किती प्रमाणात घ्यावेत, न घेतल्यास होणारे दुष्परिणाम याची सविस्तर माहिती या पुस्तकाद्वारे मिळते. हे पुस्तक मराठीत असल्यामुळे सर्वांना विशेषतः महिलांना, शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरेल, यात शंका नाही. ‘व्हिटॅमिन्स’ हे पुस्तक अनेक तरुण (भावी) संशोधकांना प्रेरणादायी ठरेल, अशी सदिच्छा करून पुनश्च लेखकांचे मनःपूर्वक अभिनंदन.
– डॉ. व्ही. सुधा राव
ट्रस्टी, भारतीय महिला वैज्ञानिक संस्था, वाशी, नवी मुंबई
व माजी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, बी.ए.आर सी. मुंबई.

Additional information

About Author

अच्युत गोडबोले
• शालान्त परीक्षेत राज्यात १६ वा; कॉलेजमध्ये, विद्यापीठात पहिला क्रमांक.
• पहिली ते आय.आय.टी.पर्यंत गणितात जवळपास सर्व परीक्षांत सर्वोच्च गुण आणि पारितोषिक,
• आय.आय.टी. मुंबईचे केमिकल इंजिनिअर, १९७२.
• सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत, इंग्लंड आणि अमेरिकेत ३२ वर्ष जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांत अनुभव.
• पटणी, सिंटेल, एल.अँण्ड टी. इन्फोटेक, अपार, दिशा वगैरे जगभराच्या व्यवसायात अनेक पटीनं वाढीमध्ये हातभार.
• सॉफ्टवेअरच्या कामानिमित्त १५० हून जास्त वेळा जगप्रवास.
• टाटा मॅग्रॉ-हिलतर्फे जगभर वापरली जाणारी कॉम्प्युटरवरची 'ऑपरेटिंग सिस्टिम्स', 'डेटा कम्युनिकेशन्स अँण्ड नेटवर्क्स', 'वेब टेक्नॉलॉजीज' आणि 'डीमिस्टिफाइंग कम्प्युटर्स' या चार प्रत्येकी ५००-७०० पानी पाठ्यपुस्तकांचं लेखन, चिनीसकट अनेक भाषांत ही पुस्तकं अनुवादित.
• मराठीतून संगणकयुग', 'बोर्डरूम', 'नादवेध', 'किमयागार', 'अर्थात', 'गुलाम', 'थैमान चंगळवादाचे', 'नॅनोदय', 'स्टीव्ह जॉब्ज', 'मनात', विक्रमी खपाकडे वाटचाल करत असलेलं 'मुसाफिर', 'गणिती', 'झपूझा' (भाग-१,२,३), 'कॅनव्हास', 'जीनियस' (शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांच्यावरच्या १२ पुस्तिका), 'लाईमलाईट', 'भारतीय जीनियस' (भाग-१,२,३) आणि 'मनकल्लोळ' (भाग-१,२), 'व्हिटॅमिन्स', 'सिंफनी' अशा अनेक पुस्तकांचं लेखन.
• 'नादवेध', 'किमयागार', 'अर्थात', 'नॅनोदय' आणि 'मनात' या पुस्तकांना राज्यशासनासह अनेक मानाचे पुरस्कार.
• याशिवाय तंत्रमंत्र', 'प्राणिजगत', 'बखर संगणकाची', 'वैद्यकायन', 'विज्ञानवाद' अशा अनेक वाचकप्रिय लेखमाला.
• आय.बी.एम.तर्फे दोनदा, पंतप्रधानांकडून दोनदा, उद्योगरत्न', आय.आय.टी.चा प्रचंड बहुमानाचा 'डिस्टिंग्विश्ड ॲल्युमिनस', पं.भीमसेन जोशींच्या हस्ते 'कुमार गंधर्व', सह्याद्री वाहिनीचा 'नवरत्न', 'लाभसेटवार', ए.आय.टी.कडून आणि उत्तुंग परिवाराकडून 'जीवनगुणगौरव', 'इंद्रधनू', 'पद्माकर देव स्मृतिगौरव पुरस्कार' असे अनेक पुरस्कार.
• 'TED' या प्रचंड प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय भाषणमालिकेत भाषण देण्याचा बहुमान.
• महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पहिल्या 'युवा साहित्य-नाट्य संमेलनाचे अध्यक्ष.
• 'आशियाना' नावाची ऑटिस्टिक मुलांची शाळा चालू करण्यात पुढाकार.
• आय.आय.टी. नंतर भिल्ल आदिवासी चळवळीत सहभाग. सध्या सॉफ्टएक्सेल कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मॅनेजिंग डायरेक्टर.

डॉ. वैदेही लिमये
बायोकेमिस्ट्री या विषयात मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट, १९९८.
• लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज (सायन हॉस्पिटल) आणि बी.ए.आर.सी. इथे संशोधन.
• संशोधनासाठी बाँबे हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटरकडून आर.डी. बिर्ला स्कॉलरशिप.
• मुंबई विद्यापीठाच्या रामनारायण रुईया कॉलेज, वझे केळकर कॉलेज, मिठीबाई कॉलेज, के.ई.एम. हॉस्पिटल इथे बी.एस्सी. आणि एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना बायोकेमिस्ट्री, फूड सायन्स, बायोअॅनॅलिटिकल आणि बायोइनऑर्गॅनिक केमिस्ट्री, क्लिनिकल रिसर्च, बायोटेक्नॉलॉजी, मेडिकल मायक्रोबायॉलॉजी या विषयांसाठी तसंच इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, माटुंगा इथे एम.फार्म. आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना फार्माकॉलॉजी, क्लिनिकल रिसर्च आणि फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी या विषयांसाठी लेक्चरर म्हणून एकूण १५ वर्षांचा अनुभव.
• २०१५ पासून हॅनोव्हर युनिव्हर्सिटी, जर्मनी इथे मेडिकल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विभागात क्लिनिकल रिसर्च शास्त्रज्ञ आणि प्रोफेसर म्हणून कार्यरत.
• अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये शोधनिबंध प्रसिद्ध.
• बायोकेमिस्ट्री, क्लिनिकल रिसर्च, एपिडेमीऑलॉजी आणि बाबोएथिक्स वा संबंधित अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये सहभाग.
• मराठी साहित्य आणि संगीत यांचा अभ्यास.
• ‘रक्त’ पुस्तक प्रकाशित २०१७,
‘व्हिटॅमिन्स’ पुस्तक प्रकाशित २०१८.

• मराठी साहित्य आणि संगीत यांचा अभ्यास.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vitamins | व्हिटॅमिन्स”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat