Why Has Nobody Told Me This Before

₹425

352 Pages
AUTHOR :- Dr Julie Smith
ISBN :- ‎ 9789371183925

Share On :

Description

मानसिक ताण, चिंता, भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव – ‡या सर्वांशी आपण रोजच सामना करत असतो. मात्र, या भावनांना कसं हाताळायचंं, मनाला स्थिर कसं ठेवायचं आणि कठीण प्रसंगांमध्ये स्वतःला कसं सावरायचं, हे बहुतेकवेळा आपल्याला शिकवलंं जात नाही.
‘व्हाय हॅज नोबडी टोल्ड मी धिस बिफोर?’ हे पुस्तक मानसशास्त्रज्ञ डॉ. ज्युली स्मिथ यांनी त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित सोप्या, व्यावहारिक मार्गदर्शनातून लिहिले आहे. या पुस्तकात लेखिकेने जी साधने शिकवली आहेत, ती बहुतेकवेळा मानसोपचारात शिकवली जातात; पण ही केवळ मानसोपचाराची कौशल्ये नाहीत तर ती जीवनकौशल्ये आहेत.
कठीण काळात आपल्यांपैकी प्रत्येकाला योग्य दिशा दाखवून पुढे जाण्याचा मार्ग शोधण्यास आणि समृद्ध जगण्यासाठी ही साधने उपयुक्त ठरणार आहेत. मनाचे काम कसे चालते हे समजून घेऊन भावनांना दडपून न टाकता त्यांच्याशी समंजस आणि निरोगी नाते निर्माण करण्यासाठी या पुस्तकातून दिशा मिळेल. त्यातून आपण केवळ सहनशक्ती विकसित करत नाही, तर जीवनात खर्‍या अर्थाने भरभराट साधतो, विकसित होत राहतो आणि हाच या पुस्तकाचा उद्देश आहे.
ताण व चिंता व्यवस्थापन, नकारात्मक विचारांवर मात करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि भावनिक संतुलन राखणे यासाठी हे पुस्तक रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणारी साधी; पण प्रभावी तंत्रे सांगते.
हे पुस्तक स्वतःला समजून घेण्यासाठी आणि आयुष्य अधिक संतुलित व सकारात्मक बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Why Has Nobody Told Me This Before”

Your email address will not be published. Required fields are marked *