Description
जर तुम्हाला बौद्धिक काम करण्याची इच्छा असेल, तर जवळपास काहीही पूर्णपणे बरे होऊ शकते. – लुईस एल. हे ‘यू कॅन हील युवर लाईफ’ हे सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक म्हणजे निरामय जीवन जगण्यासंबंधीचे सुस्पष्ट आणि सविस्तर विवेचन आहे. या पुस्तकामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडले आहे. या पुस्तकाच्या वाचनानंतर आरोग्य आणि सुस्थितीतील जीवनाबद्दल परिणामकारक प्रभाव पडतो, अशा आशयाची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. जगविख्यात अध्यापक लुईस एल. हे यांनी मन आणि शरीर यांच्यातील अंतरंगाचे यथार्थ दर्शन या पुस्तकाद्वारे घडविले आहे. मर्यादित विचार आणि त्रोटक कल्पनांमुळे आपल्यावर विशिष्ट प्रकारचे बंधन येते. त्या स्थितीचा अभ्यास करून लुईस हे यांनी आपल्याला शारीरिक व्याधी आणि अस्वस्थतेची कारणे समजावून घेण्याची गरूकिल्ली दिली आहे. जगभरातील लाखो लोकांना अनेकविध कल्पना सुचवणारी आणि स्वतःला स्वतःचीच मदत मिळवून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारी मार्गदर्शिका असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. विचारांना नवी दिशा देणारे हे आरोग्यविषयक प्रेरणादायी विवेचन आहे. लुईस हे या अधिव्याख्याता आणि अध्यापक आहेत. ‘बेस्ट सेलर’ ठरलेल्या २७ पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत. ‘हील युवर बॉडी’ आणि ‘दी पॉवर इज विदीन यू’ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. Br>जगातील निरनिराळ्या २६ भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले असून, ३५ देशांमध्ये ती पुस्तके उपलब्ध आहेत.
————————————————————————————————————————
मिरर वर्क म्हणजे आरशासमोर उभे राहून स्वत:च्या डोळ्यांत खोलवर पाहत मोठ्या आवाजात दिल्या जाणार्या प्रभावी स्वयंसूचना.
आपल्या स्वत:बद्दलच्या भावना आणि प्रतिमा आरसर तुमच्याकडे परावर्तित करतो. स्वत:रौशनदानी साधलेल्या या संवादामुळे आपल्या भावनांची धारा तसेच विचारांचा प्रवाह कुठे वाहता आहे, कुठे अवगुंठित आहे याचे भान जागृत होते. जीवनाच्या कोणत्या बाबतीतील विचारांना बदलण्याची, परिवर्तन करण्याची गरज आहे याची जाणीव होते. आपल्या जीवनाला परिपूर्णतेचा स्पर्श होतो आणि आनंदाचा बहर येतो.
मिरर वर्क म्हणजे स्वत:चे सुंदर स्वरूप समजून घेण्यासाठी, परिवर्तनाच्या बीजांची पेरणी करण्यासाठी स्वत:ला दिलेली अमूल्य देणगी होय.
———————————————————————————————————————–
ऑल इज वेल’ हे एक अव्वल दर्जाचे पुस्तक असून अंतर्ज्ञानी लुईस हे यांच्या बुद्धिमत्तेला वाहिलेली ही जणू आदरांजलीच आहे. एड्सच्या रुग्णांना तसंच इतर असंख्य व्यक्तींना आणि त्यांच्या सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देण्यात सर्वांत अग्रेसर कुणी असेल तर त्या लुईस हे आहेत.
– कॅरोलीन मीस, न्यूयॉर्क टाइम्स ‘आर्चटाइप्स : अ बिगिनर्स गाइड टू युवर इनर नेट’ या बेस्टसेलर पुस्तकाच्या लेखिका
हे पुस्तक म्हणजे, लुईस हे आणि मोना लिसा शुल्झ या दोन बेस्टसेलर लेखिकांनी मिळून, ‘हील युवर बॉडी’ या पुस्तकातल्या उत्कृष्ट शिकवणुकींचं केलेलं पुनरावलोकन आहे. ‘ऑल इज वेल’ हे पुस्तक म्हणजे लुईस हे यांनी सिद्ध करून दाखवलेली सकारात्मक पद्धती आणि मोना लिसांच्या वैद्यकीय ज्ञान व देहाचं अंतर्ज्ञान यांच्या संयोगानं निरोगी व स्वस्थ कसं राहावं यासाठीचं मार्गदर्शन आहे. याच पुस्तकात काही रुग्णांवर पारंपरिक आणि पर्यायी औषधे, सकारात्मक विचारपद्धती, आहारातील बदल इत्यादींचा शिस्तबद्ध वापर करून स्वास्थ्य मिळवण्याविषयीचा संशोधनपर अहवालसुद्धा सादर केलेला आहे.
प्रस्तुत पुस्तकाचा वापर करून शरीराचे व मनाचे स्वास्थ्य मिळवूया आणि समतोल व निरोगी आयुष्य जगूया.
Reviews
There are no reviews yet.