डॉ. जयंत विष्णू नारळीकर (जन्म : कोल्हापूर, १९ जुलै १९३८) हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. डॉ. नारळीकर हे अचानक आणि अपघाताने घडलेले पण आपली नाममुद्रा कोरलेले साहित्यिक आहेत. ‘नारायण विनायक जगताप’ या उलट्या क्रमाने आपल्या नावाची आद्याक्षरे होणाऱ्या टोपण नावाने त्यांनी विज्ञानकथा स्पर्धेत भाग घेतला. मराठी विज्ञान परिषदेच्या या स्पर्धेत या कथेला पहिले पारितोषिक मिळाले आणि नारळीकरांच्या कथा व कादंबऱ्यांचे एक नवे दालन उघडले गेले.
Add Comment