Valmiki Ramayan | वाल्मीकि रामायण

₹1499

748Pages
AUTHOR :- Madhavrao Chitale
ISBN:- 9789352201020

Share On :

Description

वाल्मीकिरामायण
श्रीवाल्मीकिरामायणाला आदिकाव्याचा दर्जा आहे. रामकथा भारतभर पसरून अनेक भाषांमध्ये रामायण लिहिले गेले आहे; परंतु फक्त मूळ वाल्मीकिरामायण समोर ठेवून त्यावर प्रवचने होणे हे मराठीत तसे अपूर्वच. श्री. माधवराव चितळे यांनी अशा या ८८ प्रवचनांचा प्रपंच पाच वर्षात पूर्ण केला. त्याचेच हे संपादित रूप!
वाल्मीकींची रचना साहित्य म्हणून सुंदर आहेच; पण ही नुसती रामकथा नाही. त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, त्यातील चालीरीती, राज्यव्यवस्था, राजाकडून असलेल्या अपेक्षा, मानवी संबंध अशा अनेक विषयांची विस्तृत मांडणी आहे. अगदी आपल्याला आश्चर्य वाटेल अशी! या प्रवचनांमध्ये अशा सर्व पैलूंवर प्रकाश टाकलेला दिसेल आणि आजच्या संदर्भातले याचे महत्त्वही कळेल. तसेच काही रूढ समजुती – उदा. सीतास्वयंवर, अहल्येची, शबरीची कथा याबद्दलही वाल्मीकींनी वेगळेच सांगितलेले दिसेल. वाल्मीकींचा हनुमान तर आपल्या कथांमधून येणाऱ्या हनुमानापेक्षा कसा वेगळा होता तेही महत्त्वाचे आहे. राम हा विष्णूचा अवतार म्हणून जन्माला आला असला तरी रामायणात त्याचे एक कर्तबगार मानव असेच चित्रण आहे, ‘राम’ असाच उल्लेख आहे. मग आपण त्याला ‘प्रभू राम’ असे का म्हणावे, ते या प्रवचनांमधील प्रदीर्घ विवेचन वाचून आपल्याला समजेल.
शेकडो वर्षांपासून भारतीय जनमानसाच्या मनावर राज्य करणारी ही रामकथा मूळ स्वरूपात आजच्या संदर्भाने कथन करण्यात आलेली असून, नवीन पिढीलाही हा ग्रंथ तितकाच रोमांचक वाटेल.

Additional information

About Author

माधव चितळे
जागतिक पातळीवर जलतज्ज्ञ म्हणून नावाजलेले, जलविकासाच्या अनेक प्रकल्पांचे शिल्पकार, उत्तम प्रशासक आणि प्रतिभाशाली वक्ते असे महाराष्ट्राला सुपरिचित असलेले माधव चितळे हे एक अष्टपैलू बहुआयामी व्यक्तिमत्त्व.
• स्थापत्याची अभियांत्रिकी परीक्षा पुणे विद्यापीठातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेतही सर्वप्रथम
• महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी सेवेत विविध पदांवर असताना धरण बांधणीत व जलव्यवस्थापनात भरीव योगदान
• केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष, भारत सरकारचे जलसंसाधन सचिव
• आंतरराष्ट्रीय पातळीवर पंधराहून अधिक वर्षे विविध पदांवरच्या जबाबदाऱ्या
• सिंचन सहयोग या चळवळीचे प्रणेते व भारतीय जलसंस्कृती मंडळाचे मार्गदर्शक
• मराठी विज्ञान परिषद व मराठी अर्थशास्त्र परिषद यांचे विश्वस्त
• महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांचे अध्यक्ष या नात्याने अनेक विस्तृत अहवालांचे सादरीकरण
• डॉक्टर ऑफ सायन्स व डॉक्टर ऑफ लिटरेचर या मानद उपाधींनी विविध विद्यापीठांकडून सन्मानित
• नोबेल पारितोषिक म्हणून संबोधलेला स्टॉकहोम जलपुरस्कार स्वीडन सरकारकडून प्राप्त – १९९३

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Valmiki Ramayan | वाल्मीकि रामायण”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat