fbpx

Jagprasiddha Shastradnyanche Ranjak Kisse | जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांचे रंजक किस्स

₹225

200Pages
AUTHOR :- Sanjay Pathak
ISBN :- 9789352201631

Share On :

Description

विज्ञानजतात घडणाऱ्या घटनांविषयी सर्वांनाच कुतूहल असते. त्यात वैज्ञानिकांच्या जीवनाविषयी जाणून घेणे तर पर्वणीच ठरते. चारचौघांसारखी वाटणारी ही माणसे असामान्य ध्येयाने प्रेरित असतात.
स्वाभिमान, साधेपणा, कामावर श्रद्धा आणि कामात झोकून देण्याची तयारी, आत्मविश्वास, चिकाटी, प्रतिकूल परिस्थितीशी झगडत मार्ग काढण्याची वृत्ती असे अनेक गुण शास्त्रज्ञांमध्ये असतात. त्यांच्याविषयी वाचून आपल्याला ज्ञान, प्रेरणा तर मिळतेच शिवाय काहीतरी करून दाखवायची जिद्दही निर्माण होते.  ‘जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांचे रंजक किस्से’ या पुस्तकात सी. व्ही. रमन, सुब्रह्मण्यम चंद्रशेखर, सत्येंद्रनाथ बोस, होमी भाभा, बिरबल सहानी, जयंत नारळीकर, ए.पी.जे. अब्दल कलाम, सॅम पित्रोदा तसेच विजय भटकर या भारतीय शास्त्रज्ञांबरोबर अनेक पाश्चात्त्य शास्त्रज्ञही भेटतात. त्यांच्या आयुष्यातील रंजक प्रसंग मनोरंजन करण्याबरोबरच खूप काही शिकवतील.  यासारख्याच शास्त्रज्ञांच्या काही रंजक माहितीची एक पर्वणीच प्रस्तुत पुस्तकातून मिळते.

Additional information

About Author

संजय पाठक
डिस्टन्स एज्युकेशन, डिप्लोमा इन जरनॅलिझम अँण्ड मास कम्युनिकेशन, डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट.
अनुभव : महाविद्यालयीन जीवनापासून लेखनास सुरुवात. अडतीस वर्षं
अध्यापन व प्रशासन क्षेत्रात. : सकाळ, गावकरी, लोकमत, बेळगाव तरुण भारत, दिनकर, नगारा,
अमृत, विज्ञानयुग, भारतीय शिक्षण यांमधून प्रामुख्याने विज्ञान विषयावर लेखन. 'हे करून पाहा', 'विज्ञानातले का व कसे?', 'मनोरंजक विज्ञान', 'डायनोसॉर', 'किस्से शास्त्रज्ञांचे', 'शास्त्रज्ञांच्या गमती-जमती' ही
सहा पुस्तके प्रकाशित. पुरस्कार : अहमदनगरच्या 'नगर टाइम्स'चा 'दा.प.आपटे पत्रकारिता पुरस्कार',
नवी दिल्ली येथील सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र (सी.सी.आर.टी.) या भारत सरकारच्या संस्थेचा 'शिक्षक पुरस्कार', 'हे करून पाहा' या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीबद्दलचा 'राजा केळकर पुरस्कार', तसेच अ.भा. बालकुमार साहित्य संमेलनाचा 'श्री.बा.रानडे पुरस्कार'. किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीबद्दलचा 'साने गुरुजी पुरस्कार' तसेच अन्य पुरस्कार.
कार्य : खगोलशास्त्र हा विशेष आवडीचा विषय. या विषयावर व्याख्याने आणि प्रात्यक्षिके. त्यातून सर्वसामान्यांचे प्रबोधन व खगोलशास्त्राची ओळख. संस्कार शिबिरे आणि विज्ञानविषयक शिबिरे व कार्यशाळा यामधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. विज्ञान प्रसाराच्या कार्यात सहभाग. लेखनाबरोबरच आकाश निरीक्षण आणि प्रवासाचा छंद.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Jagprasiddha Shastradnyanche Ranjak Kisse | जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांचे रंजक किस्स”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat