fbpx

Arogyakshetratil Mahila Sanshodhak | आरोग्यक्षेत्रातील महिला संशोधक

₹175

152Pages
AUTHOR :- Niranjan Ghate
ISBN :- 9789352202201

Share On :

Description

वैद्यक क्षेत्रातील प्रज्ञावंत शोधव्रती… ज्यांनी मानवी कल्याणाच्या ध्यासातून संशोधनाचे
कष्टमय कार्य केले, त्यासाठी अविरत झटल्या. या महिला संशोधकांनी आपल्या कार्याद्वारे जगाच्या नकाशावर आपला ठसा उमटवला; पण हे करताना त्यांना प्रत्यक्ष काय संघर्ष करावा लागला…? त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात यामुळे कोणती वादळे उठली…? याची उत्तरे या पुस्तकात सापडतात. एकीकडे ज्ञानप्राप्तीचं चिंतन आणि दुसरीकडे कुटुंब-आप्त यांची चिंता! संशोधन कार्यातील वेग आणि वैयक्तिक पातळीवरील भावनांचा आवेग. दोन्हीत स्पष्ट रेघ मारत यांनी संशोधनाला दिलेले प्राधान्य, आपली मानव कल्याणाची धडपड, खडतर वाटचालीदरम्यान दोलायमान मनोपटलावरही ठाम राहून त्यांनी सिद्धीस नेलेले कार्य! हे सारं वाचताना अचंबित होतो आपण आणि त्याचबरोबर वाटतो काहीसा खेदही… ‘स्त्री’ म्हणून संशोधन क्षेत्रात काम करताना ‘तिच्या’वरील मर्यादा, तिच्यावरील बंधनं; पण या साऱ्यावर मात करत सरतेशेवटी तिचं घवघवीत यश दिपवतं!
वैद्यकशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयातील संशोधनात सिद्ध होताना ज्या प्रज्ञावंत स्त्रियांनी अवघे आयुष्य वेचले त्यांचे हे चरित्रबंध! सुप्रसिद्ध विज्ञानलेखक निरंजन घाटे यांच्या खास शैलीतील ही मांडणी वाचकांना काहीतरी अर्थगर्भ आणि सकस वाचल्याची अनुभूती देते.

Additional information

About Author

लेखक परिचय
निरंजन सिंहेंद्र घाटे
जन्मतारीख – १०/०१/१९४६
शिक्षण – एम. एस्सी. (भूशास्त्र)
व्यवसाय – लेखन
प्रकाशित पुस्तके – १८९
० महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमधून लेख व स्तंभ प्रसिद्ध.
० अखिल भारतीय विज्ञानकथांच्या प्रातिनिधिक कथासंग्रहात कथा समाविष्ट.
० विविध शालेय तसेच महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांत लेख आणि कथांचा समावेश.
० सृष्टीज्ञान, विज्ञानयुग, पैंजण, बुवा, अद्भुत-कादंबरी, ज्ञानविकास,
किर्लोस्कर आदी मासिकांचे संपादन.
विविध पारितोषिके व सन्मान
१. 'अंटार्क्टिका' या पुस्तकास रा.द. आंबेकर विज्ञान पुरस्कार, १९९३
२. 'आधुनिक युद्धसाधने' या ग्रंथास पुणे मराठी ग्रंथालय – कै. अनंत सुर्वे
स्मृती पुरस्कार, १९९२
३. 'आत्मवेध' या ग्रंथास सार्वजनिक वाचनालय नाशिक – डॉ. वि.म. गोगटे
पुरस्कार, १९९९
४. केसरी मराठा ट्रस्ट – डॉ. वारदेकर स्मृती विज्ञाननिष्ठ प्रबोधन पुरस्कार, २००१
५. इंडियन फिजिक्स असोसिएशन, पुणे विभाग – डॉ. मो.वा.चिपळूणकर
पुरस्कार, १९९७
६. जगदीश गोडबोले स्मृती पर्यावरण लेखन पुरस्कार, २००२
७. मराठी बालकुमार साहित्य परिषद कोल्हापूर – स्नेह पुरस्कार,
जुलै २००२
८. मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर – श्री. बा. रानडे पुरस्कार,
डिसेंबर २००२
९. सु.ल. गद्रे साहित्य पुरस्कार – महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड,
जानेवारी २०१४
१०. 'ज्याचे करावे भले' या पुस्तकास बडोदा वाङ्मय परिषद,
विनोदी साहित्य पुरस्कार, २०११
११. 'विचित्र माणसांचे विश्व' या पुस्तकास गुरूवर्य मा.सी. पेंढारकर ग्रंथ
पुरस्कार – लोकसेवा संघ पारले २००५-०६
१२. 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' या पुस्तकास उत्कृष्ट वाङ्मयमूल्य असणारी
उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून विजया गाडगीळ पारितोषिक –
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, २०१७
१३. 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' या पुस्तकास कै. गोपीनाथ शिवराम पाटील
स्मृती वाङ्मय पुरस्कार – जवाहर वाचनालय, कळवे-ठाणे, २०१७
१४. साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार, २०१८ – अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ.
महाराष्ट्र शासनातर्फे मिळालेले पुरस्कार
१. 'वसुंधरा' – भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान – प्रौढ वाङ्मय (१९७९-८०)
२. 'स्पेसजॅक' – ललित विज्ञान – प्रौढ वाङ्मय (१९८५-८६)
३. 'एकविसावं शतक' – भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान – प्रौढ वाङ्मय (१९९७-९८)
४. 'जगाची मुशाफिरी' – सर्वसामान्य ज्ञान छंद व शास्त्र – बाल वाङ्मय
(२००१-०२)
५. 'विज्ञानाने जग बदलले' – डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार –
विशेष पुरस्कार (२००१-०२)
६. 'नवे शतक' – सी.डी.देशमुख पुरस्कार – प्रौढ वाङ्मय (२००४-०५)
७. 'विचित्र माणसांचे विश्व' – रेव्हरंड ना.वा. टिळक पुरस्कार – बालवाङ्मय (२००५-०६)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Arogyakshetratil Mahila Sanshodhak | आरोग्यक्षेत्रातील महिला संशोधक”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat