Description
मुलांना वाढत्या वयाबरोबर सकस आहाराची जितकी आवश्यकता असते, तितकीच गरज संस्कारक्षम उत्तम वाचन साहित्याची असते.
बालसाहित्यात पक्षी, प्राणी, देव, देवतासोबत परीकथांचाही फार मोठा खजिना आहे. सर्व जागतिक बालसाहित्यात परीकथा ह्या चांगल्याच्या प्रतिनिधी म्हणून येतात, तर दुष्टांचे प्रतिनिधी म्हणून चेटकीण – राक्षस ही पात्रं येतात.
सगळ्यांचं चांगलं व्हावं असा विचार काही पात्र करत असतात, तर दुष्ट पात्र त्या उलट विचार आणि कृती करत असतात.
जगात नेहमी सुजनांचा विजय होतो, हा परीकथांचा ढाचा असतो.
या संग्रहात, सिंड्रेला, ॲलिस, हॅन्सल आणि ग्रेटल ह्या वर्षानुवर्षे सांगितलेल्या कथा दिलेल्या आहेत. बालकांच्या स्वप्नवत कल्पना या कथांतून जागजागी दिसतात. अद्भूतता, मनोरंजन आणि साहस हे या जगप्रसिद्ध परीकथांची वैशिष्ट्ये आहेत.
Reviews
There are no reviews yet.