fbpx

Maharaja Sayajirao Aani Dr. Babasaheb Ambedkar | महाराजा सयाजीराव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

₹150

172 Pages

AUTHOR :- Baba Bhand
ISBN :- 9789352203079

Share On :

Description

बारा वर्षांचा गोपाळ बडोद्याचा राजा बनला. या सयाजीराव गायकवाड यांनी चौसष्ट वर्षे राज्य केले. त्यांचा हा मोठा कालखंड हिंदुस्थानातील सामाजिक सुधारणा आणि प्रशासनाचा अनोखा इतिहास आहे.
चौदाव्या वर्षी १८७७ ला पंगतीभेद मोडलेल्या सयाजीरावांनी पाच वर्षांनी १८८२ ला हुकूम काढून अस्पृश्यांना सरकारी खर्चाने शिक्षण देणे सुरू केले. भीमराव आंबेडकरांच्या पदवी शिक्षणाच्या पायाभरणीसह अस्पृश्यांचा क्रांतिकारक नेता डविण्यासाठी त्यांना अमेरिकेत पाठविणारे, त्यांची नऊ वर्षांच्यी शिष्यवृत्ती माफ करणारे, अस्पृश्यांना मोफत प्राथमिक व संस्कृत शिक्षण, पुरोहित परीक्षेद्वारे अस्पृश्यांना हिंदू पुरोहित होण्याची संधी देणारे, पस्तिसाव्या वर्षी बौद्ध धर्माचा परिपूर्ण अभ्यास असणारे, बडोद्यात नोकरीसाठी आलेल्या भीमरावांसाठी स्वतंत्र बंगला बांधण्याचे आदेश देणारे, जगण्यासाठी बाबासाहेबांनी पुढे राजीनामा दिला ते हिंदू कोड बिल फार पूर्वी १९०५ मध्ये बडोद्यात लागू करणारे, भारतात बौद्ध धर्माला राजाश्रय देणारे, १९३६ च्या डॉ. बासाहेबांच्या annihilation of caste या जगप्रसिद्ध प्रबंधाची पूर्वतयारी करणाऱ्या १९०९ मध्ये प्रकाशित the depressed classes या निबंधाचे लेखक आहेत महाराजा सयाजीराव गायकवाड. म्हणूनच ‘भीमराव ते डॉ. आंबेडकर’ या क्रांतिसूत्राच्या जन्मदात्या सयाजीरावांचे चरित्र लिहिण्याची इच्छा १९५० मध्ये डॉ. बाबासाहेब व्यक्त करतात.
आधुनिक भारताचे एक शिल्पकार महाराजा सयाजीराव आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन युगपुरुषांच्या संदर्भातील इतिहास जोडण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. याचे पुनर्वाचन नव्या पिढीचे आणि अभ्यासकांनी डोळसपणे करावे, ही या लेखनामागची प्रामाणिक भावना आहे.

Additional information

About Author

बाबा भांड जन्म वडजी, पैठणजवळील खेड्यात, २८ जुलै १९४९. बालपणापासून कमवा व शिका हा संस्कार. शिक्षण एम. ए. इंग्रजी. आठवीत बालवीर चळवळीत राष्ट्रपतीपदकाने सन्मानित. दहावीत जागतिक स्काउट-गाइड मेळाव्याच्या निमित्तानं अमेरिका-कॅनडा आदी दहा देशांचा प्रवास. लेखकच व्हायचं स्वप्न होतं. सहावीपासून लेखनास सुरुवात. १९७५ साली पत्नी सौ. आशाच्या मदतीनं धारा व नंतर साकेत प्रकाशनाची सुरुवात. आतापर्यंत अठराशे पुस्तकांचे प्रकाशन. बाबा भांड यांच्या आतापर्यंत नऊ कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, चार प्रवासवर्णनं, चार ललित गद्य, चार चरित्रं, चार आरोग्य व योग, नऊ संपादनं, चार अनुवाद, पंधरा किशोर कादंबऱ्या, एकोणावीस बालकथा संग्रह, तीन एकांकिका, सत्तावीस नवसाक्षरांची पुस्तके प्रकाशित. साहित्य अकादमीचा बालसाहित्य, महाराष्ट्र शासनाचे अकरा, महाराष्ट्र फाउंडेशन, दमाणी आणि इतर पंधरा पुरस्कार. माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, तसेच सदस्य सचिव, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Maharaja Sayajirao Aani Dr. Babasaheb Ambedkar | महाराजा सयाजीराव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat