Sara Kahi Mulansathi | Yashasvi Palaktavchi Gupite

₹400

352 Pages
AUTHOR :- Shobha Bhagwat, dinkar borikar
ISBN :- 978-9352205806

Share On :

Description

सध्याच्या स्पर्धात्मक युगात पालक आपल्या पाल्याबाबत अधिक दक्षव जागरूकझाले आहेत.
बाहेरचे बदलते जग, मोबाइल, इंटरनेट, टीव्हीच्या आधुनिक युगातील पालकत्व आव्हानात्मक बनले आहे. विभक्त कुटुंब, नोकरी करणारे पालक, शाळाकॉलेजातील वाढती स्पर्धा या कारणांनी गतिमान झालेल्या जीवनामुळे पालकांना व मुलांना ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पारंपरिक संस्कारांबरोबरच औपचारिक शिस्तबद्ध संस्कारांचीही गरज भासू लागली आहे.
आपल्या पाल्यावर चांगले संस्कार कसे करावेत, त्याच्यातील विविध गुणविशेषांना कसा वाव मिळू शकेल आणि त्याचे व्यक्तिमत्त्व सर्वांगाने कसे विकसित होईल, हे यशस्वी पालकत्वाची गुपिते’ या पुस्तकात सांगितले आहे. आनंददायी पालकत्व आणि शिक्षणाने आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास होईल.

———————————————————————————————————————-

आज पालकांच्या जगण्यातले ताण-तणाव मुलांमध्ये आपसूक झिरपत आहेत. पालक जिंकण्यासाठी धावत सुटले आहेत आणि बाहेरची प्रस्थापित व्यवस्था याला मदत करते आहे. अशा वातावरणात मुलाचं ‘मूलपण’ सांभाळण्याचं, जोपासण्याचं, फुलवण्याचं काम जीव तोडून कसं करायचं ते सांगण्याचा प्रयत्न म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय.
कामातला आनंद, खेळातली मजा, कष्टांचा अनुभव, निर्मितीसाठी गंमत, नात्यांची ऊब, क्वालिटी टाइम, निसर्गाशी नातं, जगण्याचा आत्मविश्वास आणि या सगळ्यांतून मुलांच्या हाती सहज लागणारी ‘मूल्यं’ या सर्वांचा हा प्रवास आहे.
आपण पालक मुलांना कधी ही पाच वाक्यं लक्षात ठेवून सांगतो का?
त् माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
त् माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे.
त् तू हे किती छान केलंस.
तुझं मत मला महत्त्वाचं वाटतं.
सॉरी बरं का! माझ्या लक्षातच नाही आलं.
पालकत्व हे शास्त्र आहे, कला आहे आणि सतत करत राहण्याचा, आनंदाचा अभ्यास आहे! तेव्हा पालकांनो, मुलांसाठी सारं काही करताना सोबतच हेही करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sara Kahi Mulansathi | Yashasvi Palaktavchi Gupite”

Your email address will not be published. Required fields are marked *