fbpx

Swatantryaveer Savarkar | Dr. Keshavrao Baliram Hedgewar

₹400

544 Pages
AUTHOR :- Shankar Karhade, Aradhana Kulkarni
ISBN :- 978-9352206414

Share On :

Description

‘काळ्या पाण्या’ची शिक्षा म्हटलं की, आपल्याला सर्वप्रथम आठवतात ते ‘स्वातंत्र्यवीर सावरकर.’
“तुजसाठी मरण ते जनन, तुजविन जनन ते मरण तुज सकल चराचर शरण, चराचर शरण”

अशा शब्दांत स्वातंत्र्याचे गुणगान करणार्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्या यातना सहन केल्या, जे बलिदान दिले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. ते एक महान देशभक्त, साहित्यिक व कवी आणि समाजसुधारक होते.

सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘मित्रमेळा अर्थात अभिनव भारत’ची स्थापना केली.
‘अखंड, एकात्म हिंदुस्थान’ अशी त्यांची ठाम भूमिका होती.

राष्ट्रभक्तीने भारावलेल्या या महान क्रांतिकारकाचे बालपण ते स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग हा प्रवास प्रस्तुत पुस्तकाद्वारे गोष्टींच्या स्वरूपातून मांडण्यात आला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन भावी काळात आदर्श नागरिक निर्माण व्हावेत या हेतूने लिहिलेले ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हे पुस्तक वाचकांना नक्कीच आवडेल, अशी आशा आहे.

————————————————————————————————————————-

“आम्ही हिंदू लोक धर्मनिष्ठ आहोत, याचा आम्हांस मोठा अभिमान वाटतो; पण धर्मरक्षण व धर्मपालन यांमध्ये फरक आहे.
स्नानसंध्यादी वैयक्तिक धार्मिक आचार यथासांग करणे म्हणजे धर्मरक्षण नव्हे.
ज्यांना धर्म जगवावयाचा आहे, त्यांच्यात धर्मावरील हल्ल्यांचा प्रतिकार करण्याची शक्ती असावयास पाहिजे.

आमच्या दीन स्थितीला आम्हीच जबाबदार आहोत. हिंदुस्थानात जर धर्मभ्रष्टता पसरली असेल तर त्याला आमची वडील पिढीच जबाबदार आहे.
परकीयांचे हल्ले त्यांना दिसत नव्हते काय? आक्रमणाची वृत्ती परकीयांत बळावत आहे, याची जाणीव ठेवा.

हिंदुस्थानात हिंदू समाज स्वतंत्र राहू शकतो, तो मानाने जगू शकतो, छाती पुढे व मान वर करून चालू शकतो, हा संघाचा विश्वास आहे.
यासाठी लागणारी शिस्त, शील आणि संघटन यांचे शिक्षण आज पंचवीस हजारांवर तरुण लोक घेत आहेत.

संघाचे लोण खेडोपाडी व प्रांतोप्रांती पोहोचले आहे. समाजाच्या ठिकाणी शक्ती, आत्मविश्वास व स्वाभिमान उत्पन्न झाला तर पंचवीस कोटी संघटित लोकांस स्वत:च्या देशात मानाने जगणे मुळीच अशक्य नाही. हा देश हिंदुस्थान म्हणून ओळखला जातो. हिंदुत्व हा या राष्ट्राचा प्राण आहे; म्हणून या देशाची, धर्माची व संस्कृतीची सर्वतोपरी जबाबदारी हिंदूंना पार पाडता यावी, ही संघाची एकच इच्छा आहे.”
– डॉ. केशवराव हेडगेवार, चांदा शिबिरातील भाषणाचा काही अंश डिसेंबर, 1936

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Swatantryaveer Savarkar | Dr. Keshavrao Baliram Hedgewar”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat