Description
राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक गो. द. पहिनकर यांचा हा भाषणसंग्रह. युवा पिढीला विधायकता आणि सकारात्मकतेकडे घेऊन जाणारे विचार या भाषणांमधून अत्यंत परिणामकारकरीत्या व्यक्त झालेले आहेत. ईश्वर आणि धर्म या संकल्पनांपासून ते शिक्षण, नागरिकत्व, स्वातंत्र्य, मन, विवेक, विधायकता, देशभक्ती अशा वेगवेगळ्या विषयांचा यात समावेश आहे. या बरोबरच मानवी जीवनाशी निगडित असणार्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांचे सकारात्मक आणि दिशादर्शक चिंतन या भाषणांच्या माध्यमातून प्रतिपादित केले आहे.
“माणूस जन्माला येतो; पण समाज त्याला घडवतो,” अशी एक म्हण आहे. माणसाला सर्वार्थाने एक परिपूर्ण माणूस बनविणारे हे विचार आहेत. आजच्या परिस्थितीत समाजमनातून हरवून गेलेली सहृदयता, सलोखा, सामंजस्य यांची रुजवण करणारी ही भाषणं आहेत. या भाषणांमध्ये लेखकाने स्वतःच्या आणि इतर अनेक श्रेष्ठ कवींच्या निवडक काव्यपंक्ती आणि महान विचारवंतांची अवतरणं यांची संयुक्तिक पेरणी केलेली आहे, त्यामुळे ही सर्व भाषणं अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक झालेली आहेत.
युवकांना त्यांच्या ध्येयपथावरून वाटचाल करीत यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचविण्यासाठी ही भाषणं मार्गदर्शक ठरतील, साहाय्यभूत ठरतील यात तिळमात्र शंका नाही. त्याशिवाय या भाषणांच्या वाचनाने उत्तम वक्ता बनण्याची क्षमतादेखील वाचकांमध्ये निर्माण होईल. यातील अनेक वाक्य सुभाषितासारखी मनाला प्रभावित करतात.
विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शैक्षणिक संस्थांनी संग्रही ठेवावा असा हा भाषणसंग्रह आहे.
Reviews
There are no reviews yet.