Life Guide | लाइफ गाइड

₹150

160Pages
AUTHOR :- Nikhil Sakhare
ISBN :- 9789352200276

Share On :

Description

“आपल्यातलं कुतूहल आणि जिज्ञासा सतत जागी ठेवून कायम शिकत राहणं ही गोष्ट मला नेहमीच महत्त्वाची वाटते. ती तेवत ठेवण्यासाठी काय करायला हवं हे निखिलनं या पुस्तकातून सांगितलंय. असं हे पुस्तक विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यावसायिक आणि गृहिणी या सगळ्यांनाच ‘गाइड’ करेल.”
– अच्युत गोडबोले
“आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ‘पुढे काय’ असा प्रश्न पडतोच. त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास हे पुस्तक मदत करू शकते. विशेषत: आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची गरज ज्याला जाणवते त्याला त्याच्या त्या ओळखीचा मार्ग नकळत सापडू शकतो. व्यक्तिमत्त्वविकास साधणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी आणि स्वत:ची पुरेशी ओळख न झालेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त असे एक सहजसोपे पुस्तक.”
– यमाजी मालकर
“सातत्यानं माझ्यातल्या उणिवा काय आहेत त्या ओळखून त्या दूर करण्यास ‘लाइफ गाइड’ प्रत्येकालाच मदत करेल असं वाटतं. जगताना, प्रत्येक पाऊल टाकताना, यशस्वी आणि सुखी समाधानी होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत यासाठी निखिलनं अतिशय छोट्या-छोट्या गोष्टींमधून एक मजबूत वाट दाखवली आहे.”
– दीपा देशमुख

Additional information

About Author

निखिल साखरे
शिक्षण : एम. कॉम
• गेल्या सात वर्षांपासून मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून कार्यरत.
• आतापर्यंत २५० हून अधिक कार्यशाळा आयोजित.
• कॉर्पोरेट ट्रेनर तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक व प्राध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजन.
• कार्यशाळेचे विषय :
१) यशाचे वैश्विक सिद्धांत (द युनिव्हर्सल लॉज ऑफ सक्सेस)
२) नेतृत्वविकास (लीडरशिप डेव्हलपमेंट)
३) संभाषणकौशल्य (कम्युनिकेशन स्किल्स)
४) महानतेचे पाच तत्त्व (द फाइव्ह पॉवर्स फॉर ग्रेटनेस)
५) कर्मचाऱ्यांना प्रेरित करा (एम्प्लॉयी मोटिव्हेशन)
६) यशस्वी पालकत्व (पॅरेंटिंग पर्फेक्टली)
७) मार्केटिंग बूस्टर्स
• इंग्रजी, हिंदी, मराठी तीनही भाषेत कार्यरत.
• पुणे, मुंबई, औरंगाबाद, सुरत, बँगलोर अशा अनेक ठिकाणी सेमिनार्स आयोजित.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Life Guide | लाइफ गाइड”

Your email address will not be published. Required fields are marked *