Description
तुमची आर्थिक प्रगती वेगाने करण्यासाठी स्टॉक्सचा वापर प्रभावीपणे करा.
भारतातले लोकप्रिय लेखक इंद्रजिथ शांथराज यांच्या ‘हाउ टू मेक मनी इन स्टॉक मार्केट ट्रेडिंग’ या पुस्तकातून शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक कशी करायची आणि त्यावर प्रभुत्व कसे मिळवायचे याची उत्तम माहिती समजते. सोप्या भाषेत सांगायचे, तर या शेअर बाजारातल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमधून मार्ग काढण्याचे, अमलात आणता येतील असे सल्ले या पुस्तकात दिलेले आहेत. त्याचबरोबर, आधी सर्व माहिती मिळवून मग ट्रेडिंगसंबंधी निर्णय घेण्यासाठी कोणती धोरणे उपयुक्त ठरतील, हेही या पुस्तकात सांगितलेले आहे.
बाजारातले ट्रेंड ओळखण्यापासून तांत्रिक इंडिकेटरचे विश्लेषण करण्यापर्यंत या पुस्तकात यशस्वीपणे ट्रेडिंग करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने आणि तंत्र उपलब्ध करून दिलेली आहेत.
प्रत्यक्ष उदाहरणे आणि त्यावरचे विश्लेषकांचे मत यात लिहिल्यामुळे, शेअर बाजाराच्या क्षणभरही उसंत नसलेल्या जगामध्ये वावरण्याची मानसिकता कशी विकसित करायची आणि त्यासाठी आवश्यक असलेली शिस्त कशी बाणवायची हेही या पुस्तकातून तुम्हाला समजेल. शिवाय, भांडवल कसे वाचवून ठेवायचे, त्याच त्या चुका परतपरत कशा करायच्या नाहीत आणि सतत शिकत राहणे कसे अनिवार्य आहे, हेही हे पुस्तक तुम्हाला दाखवून देईल.
तुम्ही नवशिके असाल किंवा अनुभवी ट्रेडर अथवा गुंतवणूकदार असाल तरीही तुमची कौशल्ये सुधारण्यासाठी, तुमची आर्थिक स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला निश्चितच मदत होईल.
इंद्रजिथ शांथराज हे २०१६ पासून पूर्णवेळ इंट्राडे ऑप्शन्स ट्रेडर आणि गुंतवणूकदार आहेत. स्टॉक मार्केटसंबंधी अनेक लोकप्रिय पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेले आहे. अल्गॉरिदम ट्रेडिंग आणि स्वतःच्या विकसित केलेल्या पद्धती असे दोन्ही वापरून ते ट्रेडिंग करतात.त्यापूर्वी, बारा वर्षेमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याचा त्यांना अनुभव आहे.
ऑप्शन्सवर तुम्ही हजारो पुस्तकं वाचाल; पण या पुस्तकात जेवढे ज्ञान दिलेले आहे तेवढे इतर कोणत्याही पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही. सगळे लेखक तुम्हाला ऑप्शन्सची माहिती, ऑप्शन्स ग्रीक्स वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र कोणत्याही पुस्तकातून तुम्हाला ऑप्शन्स तंत्रांची माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ते सांगितले जात नाही, ज्याद्वारे एखादा अत्यंत तुटपुंजे उत्पन्न असणारा माणूसही ऑप्शन्स ट्रेडिंग करून श्रीमंत होऊ शकेल. अद्ययावत माहिती असलेल्या या पुस्तकात ऑप्शन्सच्या बाराखडीपासून ते ऑप्शन्स ग्रीक्सपर्यंत सगळे काही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहे. भारतीय स्टॉक मार्केट या विषयावर लिहिणार्या महेश कौशिक यांची पुस्तकं सर्वाधिक वाचली जातात. हेही त्यांनी लिहिलेले एक अप्रतिम पुस्तक आहे.
कौशिक क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावून सांगतात. हे पुस्तकदेखील त्यांनी एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात लिहिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला ते वाचताना कुठेही कंटाळा येणार नाही. एक सामान्य वेटर असलेला घिसूभाई या गोष्टीचा नायक आहे. प्रस्तुत पुस्तकात कौशिक घिसूभाईला ऑप्शन ट्रेडिंग कसे शिकवतात याचे उत्तम सादरीकरण केलेले आहे.
विज्ञान शाखेतून पदवीधर झालेल्या महेश चंद्र कौशिक यांनी आपल्या करिअरची सुरुवात खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून केली होती. त्यानंतर राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारा राजस्थानमधील वाणिज्य कर विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या पदावर पाच वर्षे कार्य केल्यानंतर त्यांची नियुक्ती महसूल विभागात टी. आर. ए. पदी झाली. या पदावर त्यांनी 2001 ते 2017 पर्यंत कार्य केले. त्यानंतर त्यांना सहायक महसूल लेखा अधिकारी म्हणून बढती मिळाली. सध्या ते सिरोही येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत.
Reviews
There are no reviews yet.