Buddha Or Karl Marx | Majhi Atmakatha

₹375

248 Pages
AUTHOR :- Babasaheb Ambedkar
ISBN :- ‎ 978-9371184632

Share On :

Description

बुद्ध किंवा कार्ल मार्क्स’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन गौतम बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या विचारांचा तुलनात्मक अभ्यास मांडते. हा लेख प्रथम १९८७ मध्ये डॉ. बाबासाहेब आबेडकर: लेखन आणि भाषणे, खंड ३ मध्ये प्रकाशित झाला होता आणि नंतर २०१४ मध्ये डॉ. आबेडकर फाउंडेशनतर्फे पुनर्मुद्रित करण्यात आला. या लेखामध्ये, भारतीय समाजातील जातीय भेदभावासारख्या समस्यांकडे या दोन्ही बिचारवतांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय समाजातील त्रुटी विशेषतः जातीय भेदभाव यांचा शोध बुद्ध आणि मार्क्स यांच्या शिकवणींची तुलना करून घेण्याचा प्रयत्न करतात.
डॉ. आंबेडकरांच्या मते, बुद्धांची शिकवण वैयक्तिक आत्मज्ञान, नैतिक आचारसंहिता आणि खाजगी मालमत्तेच्या उन्मूलनावर आधारित असून ती शांततामय, समानतेची दिशा दाखवते. याउलट, मार्क्सचा वैज्ञानिक समाजवाद वर्गसंघर्ष, क्रांतिकारी हिंसा आणि सर्वहारा हुकूमशाहीचा मार्ग स्वीकारतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर दोन्ही विचारवंतानी सुचवलेल्या साधनांची तुलना करताना असे अधोरेखित करतात की, बुद्धांचा शांत, नैतिक आणि जातिविरहित समाजाचा संदेश भारतीय परिस्थितीस अधिक अनुकूल आहे. हा लेख वाचकांना समानता आणि सामाजिक परिवर्तन यासंदर्भात बौद्ध तत्त्वज्ञान आणि मार्क्सवादी विचारसरणीकडे नव्याने आणि संतुलित दृष्टिकोनातून पाहण्यास प्रवृत्त करतो.

“मी वर्गीकृत लोकांत जन्मलो. त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्च करावयाचे, याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणीच केलेली आहे. या प्रतिज्ञेपासून च्युत करणारी अनेक आमिषे मला माझ्या आयुष्यात आली व गेली.फक्त स्वतःचेच चांगले करण्याचे मी लहानपणात ठरविले असते तर मला हव्या त्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आले असते आणि काँग्रेसमध्ये मी शिरलो असतो तर तिच्यातील अत्यंत श्रेष्ठ पदाचा मी उपभोग केला असता. परंतु वर्गीकृत लोकांच्या उन्नतिप्रीत्यर्थ माझे सर्व आयुष्य वाहण्याचे ठरविले आहे आणि हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी एका तत्त्वाचा अवलंब करीत आलो आहे. ते तत्त्व हे की, जे कार्य सफल करण्याचा एखाद्याला भरपूर उत्साह वाटतो व ते कार्य पार पाडणे हेच ज्याच्या मनाला एकसारखे लागून राहिलेले आहे, त्याने ते कार्य पार पाडण्यासाठी आकुंचित विचारसरणीचा व कृतीचा अवलंब केला तर ते श्लाघ्य होईल. वर्गीकृत लोकांच्या हिताहिताचा प्रश्न सरकारने फार दिवस त्रिशंकूप्रमाणे लोंबकळत ठेवलेला आहे. हे पाहन माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची तुम्हाला (वरील हकिकतीवरून) कल्पना येईल.’
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, बॅरिस्टर, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधन केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चामध्ये सामील झाले, समाजप्रबोधनात्मक वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. इ.स. २०१२ मध्ये, द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, ज्ञानसाधक, अभ्यासक आदींना प्रेरक ठरेल, असा विश्वास वाटतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Buddha Or Karl Marx | Majhi Atmakatha”

Your email address will not be published. Required fields are marked *