Description
प्रस्तुत ग्रंथामुळे स्त्रियांचे अनेक शारीरिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक प्रश्न व्यापकपणे समाजासमोर आले आहेत.गर्भारपणातील आरोग्यविषयक आणि सामाजिक समस्यांची अतिशय सुबोध अशी चर्चा आणि उपायांसंबंधीचे मार्गदर्शन या ग्रंथात करण्यात आले आहे.
डॉ. सुधीर रसाळ ज्येष्ठ समीक्षक व लेखक
पाना-पानांवर लेखिका जे कळकळीने सांगतात,ते केवळ स्त्री आणि तिच्या नातेवाइकांसाठीच नाही.नव्या डॉक्टरांसाठीही एक संयत आणि समष्टीच्या कल्याणाचा सूर असणारा एक अप्रत्यक्ष हितोपदेश आहे.
– डॉ. वृषाली किन्हाळकर
प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपले मूल ! आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास उत्तम व्हावा याकरिता प्रत्येक पालक तळमळीने प्रयत्न करीत असतात.
आपले मूल सुंदर, हुशार आणि बुद्धिमान असावे, अशी बहुतेक पालकांची अपेक्षा असते. आपल्या मुलाला बुद्धिमान घडविण्यासाठी बहुतेक सर्वच पालक अनेक प्रकारे प्रयत्न करीत असतात. हुशार मुले ही पूर्वसंचिताचे फळ आणि परमेश्वराची देणगी असते, असे अनेक पालक आतापर्यंत समजत असत. पण गेल्या काही वर्षांत मेंदू आणि बुद्धिमतेचा विकास यात अतिशय मोलाचे संशोधन झाले असून त्यातून पुढे आलेली माहिती अतिशय आनंददायक आणि उत्साह वाढविणारी आहे.
आता अनेक संशोधनांनी हे सिद्ध झाले की, बाळाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया हा त्याच्या बालपणातच दडलेला असतो. तेजस्वी मूल हवे असल्यास गरोदरपणी कोणती काळजी घ्यावी, जन्मानंतर बाळाच्या बुद्धीचा विकास कसा करावा, स्मरणशक्ती कशी वाढवावी व बाळाला कसे शिकवावे ! ही सर्व माहिती देणारे हे पुस्तक प्रत्येक पालकास नक्कीच उपयुक्त ठरेल.
Reviews
There are no reviews yet.