Description
आपण अभ्यास करावा, परीक्षेत चांगले आपण अभ्यास करावा, परीक्षेत चांगले यश मिळवावे आणि गुणवंत विद्यार्थी म्हणून शाळेत, कुटुंबात तसेच समाजात स्थान मिळवावे, असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असते. त्यासाठी खूप अभ्यास करण्याची इच्छा असली तरीही अभ्यास नेमका कसा करावा, हेच अनेक विद्यार्थ्यांना कळत नाही. अभ्यासात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी सर्व गुपिते या पुस्तकात उघड करून सांगितली आहेत. साध्या, सोप्या आणि सहज समजणाऱ्या भाषेत सांगितलेली ही गुपिते कोणताही विद्यार्थी सहज माहीत करून घेऊ शकतो. अभ्यासातील यशाची गुपिते माहीत करून घेण्यासाठी हे पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचण्याची किंवा आधी या पुस्तकाचा अभ्यास करण्याची अजिबात गरज नाही. या पुस्तकाचे कोणतेही पान उघडा आणि वाचा, अभ्यासातील यशाचे एक तरी गुपित तुमच्या हाती लागल्याशिवाय राहणार नाही. रिकाम्या वेळेत सहज चाळता चाळता विद्यार्थ्याला अभ्यासाचे रहस्य उलगडून दाखविणारे एकमेव पुस्तक. |
Reviews
There are no reviews yet.