Description
प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून ‘लेखक -मुलाखतकार’ म्हणून वाचकांच्या भेटीस येत आहेत.
‘चैत्रेय’ या वाचकप्रिय वासंतिक अंकाचे रसज्ञ संपादक म्हणूनही ते महाराष्ट्राला माहीत आहेत.
‘प्रतिभा संगम’ चे शिल्पकार म्हणून युवापिढीतील साहित्यिकांत त्यांना मानाचे स्थान आहे.
असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांना जेव्हा ‘बोलते’ करते तेव्हा ती केवळ वृत्तपत्रीय स्वरूपाची प्रासंगिक मुलाखत असत नाही; तर एका ‘जगण्या’ चा तो प्रामाणिक शोध असतो. प्रा. नरेंद्र पाठक यांचे ‘अनुभवाचिया वाटा’ हे पुस्तक ध्येयवेड्या व्यक्तिमत्त्वांची जगण्याची शोधयात्रा आहे. …असा शोध घेताना संवादकाकडे आवश्यक असणारे बरेचसे गुणविशेष प्रा. पाठक यांच्या लेखणीत आहेत. औत्सुक्य, व्यासंग, मनोगत टिपणारी संवेदनशीलता, ज्या मनाशी व कार्यक्षेत्राशी संवाद साधत आहोत त्याबद्दलचा आदर आणि हे सर्व असूनही एक सर्जनशील तटस्थता या लेखनात दिसून येते. प्रा. नरेंद्र पाठक यांनी विविध क्षेत्रांतील कर्तृत्वांंशी जी बातचीत केली- ती एक मनमोकळी प्रसन्न मैफल झाली आहे. विशेष म्हणजे त्या आयुष्याला जाणून घेण्यासाठी जी एक स्वाभाविक लीनता लागते ती प्रा. पाठक यांच्यात असल्यामुळे- द. मा. मिरासदार, मंगेश पाडगावकर, राजदत्त, प्रभाकरपंत पणशीकर अशी नक्षत्रांकित नावे त्यांच्याशी हातचं न राखता बोलली व त्यातून या मंडळींनी इतरत्र न व्यक्त केलेली गुजे- मित्रत्वाच्या नात्याने नरेंद्रजींना सांगितली व त्यातून हा ललित संवादबंध साकार झाला. हे लेखन सर्वच वयोगटातील उत्सुक वाचकांना भावणारे आहे. याचे कारण हे आहे की, ओळखीच्या आदरणीय व्यक्तींची शब्दरूप भेट घडवतांना प्रा. पाठकसरांनी एक आदर्श व्यक्तिमत्त्व घडताना त्यांनी केलेला संघर्ष, झेललेले मानापमान, आरंभीच्या पहिल्या पावलापासून त्यांची ध्येयनिश्चिती, झपाटलेल्यांचे मनोज्ञ दर्शन प्रस्तुत ग्रंथातून घडते. नव्या लेखकांना कलावंतांना तर या पुस्तकाच्या रूपाने ‘एक उत्कृष्ट मार्गदर्शक’ च मिळाला आहे, असे जाणवेल.
Reviews
There are no reviews yet.