Description
यशाचा आणि सुखाचा मार्ग’ हे पुस्तक यशस्वी कसे व्हावे आणि आपले जीवन अर्थपूर्ण कसे करावे हे या बद्दल आहे. जीवनातील संघर्ष आणि संधी याबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे.
लेखक ए. पी. पेरेइरा हे जीवनात येणाऱ्या संधी आणि संघर्ष या बाबतीतील सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे हे सांगतात. जगत असताना तुमच्याशिवाय कोणीच तुम्हाला सहाय्य करणार नाही, यावर त्यांचा दृढविश्वास आहे. लोकप्रिय आणि सर्वाधिक खपाची पुस्तके लिहिणारे आणि success in 30 days च्या लेखकाचे हे नवे पुस्तक.
————————————————————————————————————————–
या पुस्तकातील काही प्रेरणादायी विचार :
माणूस केवळ त्याच्या विचारांना उन्नत करून उभारी घेऊ शकतो, जिंकू शकतो आणि सिद्धी मिळवू शकतो.
माणूस स्वत:मुळेच घडतो किंवा बिघडतो. विचारांची योग्य निवड व खरा वापर करून तो दैवत्वाची उंची मिळवू शकतो; तर विचारांच्या चुकीच्या वापराने, दुर्विचाराने त्याची अधोगती पशूंपेक्षा खालच्या पातळीपर्यंत होऊ शकते. दैवत्व आणि पशू या दोन अंतिम ध्रुवांच्या दरम्यान चारित्र्याच्या विविध छटा असतात आणि मानव त्यांचा निर्माता व धनी असतो.
चांगले विचार, चांगल्या कृती कधीच वाईट परिणाम आणू शकत नाहीत; वाईट विचार व कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाहीत.
ज्याने शंका व भीतीवर विजय मिळवला त्याने अपयशावर विजय मिळवला असे समजा. त्याचा प्रत्येक विचार शक्तीने भारावलेला असतो, सगळ्या अडचणींना हिमतीने तोंड दिलेले असते व शहाणपणाने त्यांच्यावर मात केलेली असते. योग्य ऋतूमध्ये त्यांच्या हेतूंची पेरणी झालेली असते. त्यामुळे ते बहराला येतात. त्यांना अशी फळे लगडतात जी कधीच जमिनीवर पडत नाहीत.
शरीर मनाचा गुलाम असतो… आनंदी आणि सौंदर्यपूर्ण विचारांच्या आदेशाने त्याला तारुण्याची आणि सौंदर्याची झळाळी येते.
Reviews
There are no reviews yet.