Description
व्हा तुम्ही तुमच्या यशास पाठबळ मिळेल अशा पद्धतीने विचार करता, बोलता आणि तशी कृती करता, तेव्हा तुम्ही यशाची दारे खऱ्या अर्थाने सर्व बाजूने ठोठावत असता… आणि जीवनातील तुमच्या अपूर्व अशा यशाच्या मार्गाने वाटचाल करीत असता.
तुम्ही अशा प्रवासाचा आरंभ करीत आहात की, जो तुम्हाला स्वप्नवत असलेले यश आणि आनंद मिळवून देणार आहे, तर मग चला प्रवासास सुरुवात करू या….
या पुस्तकात प्रामुख्याने लेखकाला स्वत:ला आलेले नैराश्य पळवून लावण्यासाठी त्याने केलेले जोरदार प्रयत्न आणि कालांतराने त्यावर केलेली मात हे खरोखरीच विलक्षण असून, इतरांना प्रेरणात्मक ठरणारी अशीच बाब आहे.
‘‘हे पुस्तक पूर्णत: मनोवृत्ती या विषयावर आधारित आहे. या इंग्रजी पुस्तकाबद्दल येथे आवर्जून सांगावेसे वाटते की, वेळोवेळी आणि प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीस नमूद केलेली उदाहरणे, किस्से हे खूपच खुमासदार आणि मार्मिक असे आहेत. मनुष्याच्या जीवनात दृष्टिकोन किती महत्त्वपूर्ण काम करतो, हे पदोपदी लक्षात येते. ‘दृष्टिकोन म्हणजेच सर्वकाही’ आणि ‘तुमच्या दृष्टिकोनात बदल करा… आणि तुमचे जीवनच बदलेल!’ या दोन्ही उक्ती किती सार्थ आहेत, हे पुस्तक वाचताना लगेच पटते. ’’
– डॉ. मोहन उचगावकर
———————————————————————————————————————–
जीवनातील उत्साह आणि ऊर्जा कायम राहावी म्हणून प्रत्येक व्यक्तीला प्रेरणादायक असे काहीतरी हवे असते. अर्थात आपल्याला प्रोत्साहित आणि उत्साहित करणार्या विचारांपेक्षा अधिक परिणामकारक दुसरे काहीच नसते. कोणत्याही व्यक्तीच्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक स्वरूपात बदल घडविण्याचे सामर्थ्य विचारांमध्ये असते. आपला प्रत्येक दिवस अर्थपूर्ण व्हावा यासाठी विचार फार महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी आपल्याला फक्त रोज एका चांगल्या विचारावर लक्ष केंद्रित करायचे असते. एखादा विचार तुमच्या मनात जितका जास्त खोलवर रुजतो तितका त्याचा तुमच्यावर दीर्घ परिणाम होतो. म्हणून या पुस्तकात अतिशय प्रेरणादायक आणि सकारात्मक असे365 विचार दिलेले आहेत. वर्षातील प्रत्येक दिवसासाठी एक विचार आहे. प्रत्येकाने आपले स्वत:चे भले करून घ्यावे, असे सांगणारे हे पुस्तक आहे. हे औषध घ्या आणि अधिक सामर्थ्यवान अधिक आनंदी व्यक्ती बना. तुमचा प्रत्येक दिवस वैशिष्ट्यपूर्ण व्हावा यासाठी हे विचार तुम्हाला उपयुक्त ठरतील, अशी मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो.
– नॉर्मन व्हिन्सेन्ट पील
Reviews
There are no reviews yet.