fbpx

Breaking the Habit of Being Yourself | ब्रेकिंग द हॅबिट ऑफ बीइंग युवरसेल्फ

₹425

424 Pages

AUTHOR :- Joe Dispenza
ISBN :- 9789352203147

Share On :

Description

प्रखर इच्छा आणि मानसिक ऊर्जा यांच्या साहाय्याने आयुष्यात अपेक्षित चांगला बदल व तुमच्या प्रयत्नांचे फळ तुम्ही नक्कीच अनुभवू शकता. ध्यानसाधनेच्या माध्यमातून जीवनात लक्षणीय बदल करणे शक्य होते. आपले मन, शरीर आणि आपली परिस्थिती, यात काही चांगले बदल घडवून आणण्यासाठी ध्यानधारणेची कौशल्ये कशी आत्मसात करावी याबद्दल प्रस्तुत पुस्तकात मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी अगोदर मज्जासंस्थेसंबंधित आणि आण्विक भौतिक शास्त्राविषयी मूलभूत तसेच माहितीपूर्ण विवेचन या पुस्तकात केले आहे. संकुचित मनोवृत्ती आणि वाईट सवयींपासून मुक्त होऊन आपल्या ध्येयानुसार स्वत:चे नवीन आयुष्य घडवण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक आहे!

Additional information

About Author

डॉ. जो डिस्पेन्झा यांनी रट्जर्स युनिव्हर्सिटी येथे बायोकेमिस्ट्रिचे शिक्षण घेतले. त्यानंतर न्यूरोसायन्स या विषयावर भर देऊन बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली. अटलांटा शहरातल्या ‘लाइफ युनिव्हर्सिटी’मधून त्यांनी विशेष प्रावीण्यासह ‘डॉक्टर ऑफ कायरोप्रॅक्टिक’ची पदवी मिळवली. डॉ. डिस्पेन्झा यांनी मज्जातंतू विज्ञान व शास्त्रीय अभ्यास, मेंदूचे कार्य आणि त्यातील संबंधित रसायने आणि पेशीरचनाशास्त्र या विषयांवर पदव्युत्तर प्रशिक्षण घेतले. स्मृती-निर्मिती, वार्धक्य- प्रक्रिया आणि दीर्घायुष्य या विषयांत ते सातत्याने नवनवे ज्ञान संपादन करत असतात. ‘व्हॉट द ब्लीप डू वी नो!?’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटात सहभागी असलेल्या अनेक शास्त्रज्ञ, संशोधक व शिक्षकांपैकी डॉ. जो हे एक आहेत. मानवी मेंदूचा उपयोग व कार्य या विषयावर त्यांनी जगातील जवळपास 24 देशांंमध्ये व्याख्याने दिली आहेत. प्रवास किंवा लेखन करत नसताना डॉ. जो ऑलिंपिया (वॉशिंग्टन) येथील त्यांच्या कायरोप्रॅक्टिक क्लिनिक्मध्ये रुग्णांना भेटण्यामध्ये व्यस्त असतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Breaking the Habit of Being Yourself | ब्रेकिंग द हॅबिट ऑफ बीइंग युवरसेल्फ”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat