Description
छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरूष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य! आज राष्ट्रउभारणीसाठी देशातल्या प्रत्येक तरुणाने छत्रपतींच्या व्यूहनीतीचा साकल्याने विचार अन् अंगीकार करणे क्रमप्राप्त आहे.
————————————————————————————————————————-
१९५०-६० च्या दशकात ज्या पिढीने जीवनातील पहिले एक दीड दशक पूर्ण केले होते, असा आजचा एकही ज्येष्ठ नागरिक नसेल की ज्याने त्याच्या बालपणी साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक वाचले नसेल. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’, ‘मीरी’ अशा कादंबऱ्या वाचून ज्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या नसतील अशी व्यक्ती विरळच. अत्यंत साधी, सरळ; पण काळजाचा ठाव घेणारी हृदयस्पर्शी भाषा हे गुरुजींच्या लिखाणाचे वैशिष्ट्य. आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र म्हणजे ‘श्यामची आई’ असे म्हणता येईल. खुद्द गुरुजी म्हणतात की, “ही कथा लिहिताना हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे. या गोष्टी लिहीत असताना माझे डोळे शतवार ओले झाले होते. हृदय गहिवरून व उचंबळून आले होते. माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना ‘श्यामची आई’ वाचून जर वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल. आपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी; पण हे संस्कार उपदेशाच्या डोसाच्या रूपात मुलांना न पाजता स्वत:च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्याछोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श ‘आई’ आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आईबाबांसाठी प्रेरक ठरेल, हे निश्चित.
Reviews
There are no reviews yet.