Description
वाचकाने परतपरत वाचावे असे हे पुस्तक आहे. सर्वांना समजेल अशा भाषेतील हे पुस्तक घरातल्या सगळ्यांनी वाचावे आणि संदर्भ म्हणून संग्रही असावे. – दीपक घैसास
सुप्रसिद्ध उद्योजक
आर्थिक स्वातंत्र्य असले तर मनाजोगत्या गोष्टी करता येतात आणि सातत्य ठेवून गुंतवणूक केली तर ते मिळवणे प्रत्येकाला शय आहे. त्यासाठी लागणारे अर्थनियोजन कसे करावे आणि म्युच्युअल फंडाचे सोपे; तरीही परिणामकारक साधन वापरून आपली आर्थिक स्वप्नं कशी साकार करावीत, हे या पुस्तकातून समजते. बहुविध गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या तज्ज्ञ लेखकाने सोप्या भाषेतून लिहिलेले हे पुस्तक गुंतवणुकीचा वाटाड्या बनून तुमची वाट सुकर करेल.
आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याकरता म्युच्युअल फंडाचे तंत्र कसे समजून घ्यावे आणि प्रगतिपथावरील भारतीय अर्थव्यवस्थेच्या साहाय्याने सर्व वयाच्या गुंतवणूकदारांनी धनवृद्धी कशी करावी, हे संवादातून समजावणारे पुस्तक!
अरविंद शं. परांजपे
बी.एस्सी., एफ.सी.एम.ए., ए.सी.एस.
अरविंद परांजपे हे सार्थ वेल्थ प्रा. लि. या म्युच्युअल फंड वितरण करणार्या कंपनीचे संचालक असून त्यांना अर्थक्षेत्रातला चाळीस वर्षांचा अनुभव आहे. पर्सनल फायनान्स या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे आणि व्याख्यानेही दिली आहेत.”
खेळण्या-बागडण्याच्या वयात एखादं मूल कोकच्या बाटल्या विकतं, घरोघरी वर्तमानपत्र टाकतं. एवढंच नव्हे तर यांसारखे अनेकविध व्यवसाय करून मिळवलेल्या रकमेतून अकराव्या वर्षी शेअर्सची खरेदी करतं… लवकरच जमीन विकत घेतं आणि इन्कम टॅक्सचं रिटर्न दाखल करून हशारीने आपली मिळकत व खर्च यांचा हिशेबही मांडतं…
ही कोणतीही काल्पनिक कथा नव्हे तर हे आहे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या बालपणाचं वर्णन…
जगाला स्तिमित करणारं गुंतवणुकीचं साम्राज्य उभं करणारे वॉरन जितके श्रीमंत आहेत तितकेच मूल्यसंपन्नही. सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक तत्त्वं आणि अफाट दानशूरता हे त्यांच्या लखलखत्या कारकिर्दीतील महत्त्वाचे पैलू.
व्यवस्थापनातील आदर्श असलेल्या वॉरन यांनी आपल्या यशाची सूत्रं वेळोवेळी सर्वांसमोर खुली केली आहेत. त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणुकीकडे बघण्याचा विवेकी दृष्टिकोन देऊन त्यांनी गुंतवणूकदारांसमोर आदर्शही ठेवला आहे.
त्यांच्या याच दृष्टिकोनातून आकाराला आलेले हे अनोखे गुंतवणूक मंत्र वाचकांसाठी दीपस्तंभ ठरतील.
Reviews
There are no reviews yet.