Gharich Banvuya Bahulya Aani Khelni, Vidnyanat Ase Ka Hote, Prayogatun Januya Vidnyanatil Gammat Sopya Paddhatine Vidnyan Shikvinare Prayog

₹340

304 Pages
AUTHOR :- D. S. Etokar, Sanjay Pathak
ISBN :- 978-9352204809

Share On :

Description

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बाहुल्यांचे आकर्षण असते. छोट्या मुलांना बाहुलीसोबत खेळताना वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. लहान मुली आपापल्या घरून बाहुल्या आणून त्यांना कपड्यांनी, दागिन्यांनी, फुलांनी सजवून भातुकलीचा खेळ खेळतात व बालपण रम्य करतात. प्रस्तुत पुस्तकात वेगवेगळ्या बाहुल्या आणि खेळणी कशा तयार करायच्या, याची माहिती व तंत्र दिलेले आहे. हे तंत्र अगदी सहज सोपे आहे. लहान मुलांना याचा वापर करून नवनवीन खेळणी बनवता येईल. शिवाय याने पालकांचीही महागडी खेळणी घेण्यापासून सुटका होईल आणि नवनिर्मितीचा आनंद घेण्याबरोबरच मुलांची सर्जनशीलता वाढीला लागेल. आपण स्वत: बनवलेली खेळणी मुले मोठ्या आस्थेने खेळतील.

————————————————————————————————————————-
वनस्पतींना दिशांचे ज्ञान कसे होत असेल बरं? पडलाय कधी प्रश्न ? पाऊस किती पडला हे आपल्याला मोजता येतं माहितीये तुम्हाला? नाही? मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे… विज्ञान हा खरं म्हणजे जितका पुस्तकातून शिकण्याचा विषय आहे तितकाच तो प्रत्यक्ष प्रयोगातून किंवा प्रात्यक्षिकांद्वारे शिकविण्याचा आणि शिकण्याचाही विषय आहे. प्रयोगांमधून आपल्याला निसर्गातल्या अनेक संकल्पना उलगडतात. विज्ञानातले वेगवेगळे सिद्धांत, नियम, तत्त्वे या गोष्टी विद्यार्थ्यांना समजावून सांगायच्या असतील तर त्यासाठी प्रयोग करणे व करवून घेणे वा प्रात्यक्षिक दाखविणे आवश्यक असते. प्रयोगाच्या या पुस्तकात तुम्हाला वेगवेगळे प्रयोग कसे करावेत ते सोप्या पद्धतीने समजेल आणि विज्ञान विषयातली तुमची रुची वाढेल यात शंका नाही. केवळ विद्यार्थीच नव्हे तर विज्ञानाची आवड असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे प्रयोग सहज करता येण्याजोगे आहेत. तेव्हा साध्या साध्या वस्तूंच्या माध्यमातून घरबसल्या विज्ञानाचे रंजक प्रयोग करा आणि तुमच्या हुशारीने इतरांना चकित करा… विज्ञानाच्या प्रयोगांचं हे पुस्तक तुम्हाला जीनियस बनवेल… चला तर मग… जाणून घेऊया. विज्ञानात असे का होते?

————————————————————————————————————————-
पोस्टकार्ड पेलतं चार किलोंचा भार. कसं काय बरं? माहीत नाही ना! पाण्यालाही ताण येतो याविषयी तुम्हाला काही माहितीये का? नाही ना! मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. . . विज्ञान हा खरं म्हणजे जितका पुस्तकातून शिकण्याचा विषय आहे तितकाच तो प्रत्यक्ष प्रयोगातून किंवा प्रात्यक्षिकांद्वारे शिकविण्याचा आणि शिकण्याचाही विषय आहे. प्रयोगांमधून आपल्याला निसर्गातल्या अनेक संकल्पना उलगडतात. विज्ञानातले वेगवेगळे सिद्धांत, नियम, तत्त्वे या गोष्टी विद्यार्थ्यांना समजावून सांगायच्या असतील तर त्यासाठी प्रयोग करणे व करवून घेणे वा प्रात्यक्षिक दाखविणे आवश्यक असते. प्रयोगाच्या या पुस्तकात तुम्हाला वेगवेगळे प्रयोग कसे करावेत ते रंजक पद्धतीने समजेल आणि विज्ञान विषयातली तुमची रुची वाढेल यात शंका नाही. केवळ विद्यार्थीच नव्हे तर विज्ञानाची आवड असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे प्रयोग सहज करता येण्याजोगे आहेत. तेव्हा साध्या साध्या वस्तूंच्या माध्यमातून घरबसल्या विज्ञानाचे रंजक प्रयोग करा आणि तुमच्या हुशारीने इतरांना चकित करा. . . विज्ञानाच्या प्रयोगांचं हे पुस्तक तुम्हाला जीनियस बनवेल. . .

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Gharich Banvuya Bahulya Aani Khelni, Vidnyanat Ase Ka Hote, Prayogatun Januya Vidnyanatil Gammat Sopya Paddhatine Vidnyan Shikvinare Prayog”

Your email address will not be published. Required fields are marked *