Description
प्रस्तुत ‘हिंदूत्व’ पुस्तक चार भागांत आहे. यात प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या ओजस्वी शैलीत व परखडपणे हिंदुत्वाविषयी आपले विचार मांडलेले दिसतात. हिंदू धर्माची झालेली अवस्था आणि त्याची कारणमीमांसा केलेली दिसते. वेदपूर्वकाळापासून मुसलमानांच्या आक्रमणानंतर भारतभूमीच्या झालेल्या अवस्थेचे चिकित्सात्मक पद्धतीने वर्णन करून हिंदू धर्माच्या र्हासाची व अध:पाताची कारणे स्पष्टपणे मांडलेली दिसतात. त्याचबरोबर प्रबोधनकार आपल्या लिखाणातून भिक्षुकशाहीवरही जोरदार प्रहार करतात. भिक्षुकशाही सामान्य जनतेला कसं जेरीस आणते आणि स्वत:चा स्वार्थ कसा साधते, देवांच्या देवळांची निर्मिती करून त्यांना व्यावसायिक रूप कसे आणते, यांविषयी ते परखडपणे आपले विचार मांडतात. यासाठी या देशातील तरुणांनी स्वयंप्रेरणेने या बंडाच्या विरुद्ध उभे राहून त्यांच्या विचारांचा हातोडा अशा पद्धतीने चालवावा की, तो थेट देवावर आणि देवाच्या देवळावर पडेल असा आशावाद प्रबोधनकार या लेखातून बोलून दाखवितात.
प्रबोधनकार केशव ठाकरे हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, मराठी साहित्यिक आणि सामाजिक विचारांचे अग्रणी होते. त्यांना ‘प्रबोधनकार’ या नावाने ओळखले जाते, कारण त्यांनी समाज प्रबोधनासाठी ‘प्रबोधन’ मासिकाचे संपादन केले. प्रबोधनकार ठाकरे हेे समाजाच्या समस्यांकडे तटस्थपणे पाहत असत. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजमान्यता असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. जातीय शोषण, प्रथा-परंपरा, भोंदूगिरी यांविरुद्ध लिखाणाद्वारे आवाज उठविला. तसेच त्यांनी विविध विचारप्रधान लेख, कादंबर्या आणि नाटके लिहिली. त्यांच्या विचारांनी समाजवादी आणि विचारप्रवर्तक आंदोलनाला बळ दिले. समाज प्रबोधनाचे ते मूर्तिमंत उदाहरण होते आणि त्यांनी आपल्या लेखणीतून समाजाला नवी दिशा दिली.







Reviews
There are no reviews yet.