How to Win Friends and Influence People | Develop Self-Confidence

₹400

552 Pages
AUTHOR :- Dale Carnegie
ISBN :- B09HQYR365

Share On :

Description

हाउ टू विन फ्रेंड्स अॅण्ड इन्फ्लुअन्स पीपल’ हे डेल कार्नेगी यांचे व्यक्तिमत्त्वविकासासाठीचे अत्यंत लोकप्रिय पुस्तक असून जगभरात त्याच्या आजवर लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत.

खालील १२ प्रकारे हे पुस्तक मदतगार ठरू शकते.

चाकोरीबद्ध मनाला उभारी देणारे नवीन विचार, आकांक्षा आणि नवीन दृष्टिकोन बहाल करते.

सरळसाध्या रीतीने, लवकरात लवकर मित्र कसे मिळवावेत यासाठी मार्गदर्शन करते.

लोकप्रियता वाढवण्यासाठी मदत करते.

तुमची विचारपद्धती इतरांना पटवून, त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रेरक ठरते.

कामे हातोहात होण्यासाठी तुमची क्षमता, प्रभाव आणि तुमची प्रतिष्ठा वाढवते.

नवीन ग्राहकवर्ग आकर्षित करून घेण्यासाठी मदत करते.

तुमची पैसा कमावण्याची पात्रता वाढवते.

एक चांगला विक्रेता, एक चांगला व्यवस्थापक तयार करते.

तक्रार निवारण करणे, कडवे वाद टाळणे आणि तुमचे मानवी संबंध मृदू व आल्हाददायक राखण्यास मदत करते.

चांगला वक्ता, मनोज्ञ संभाषणपटू होण्याचा मार्ग दाखवते.

तुमच्या दैनंदिन जीवनात मानसशास्त्रीय तत्त्वांचा अंतर्भाव सहजसोप्या पद्धतीने कसा करायचा ते शिकवते.

तुमच्या सहकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचे गुपित सांगते.
————————————————————————————————————————

लोकप्रिय वक्ता कसे व्हावे? हे या व्यवहार्य, सुगम आणि मौल्यवान मार्गदर्शकातून जाणून घ्या
हे पुस्तक तुम्हाला व्यवहार्य आणि आचरणात आणण्याजोगे सोपे उपाय सांगते, ज्यांच्या मदतीने तुम्ही लोकांसमोर उत्तम प्रकारचे भाषण करू शकाल आणि प्रारंभापासूनच श्रोत्यांचे लक्ष वेधून घेऊ शकाल.
प्रस्तुत पुस्तकात डेल कार्नेगी जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या वक्त्यांच्या महत्त्वपूर्ण भाषणांचे विश्लेषण करतात- थेट अब्राहम लिंकनपासून ते रुझवेल्टपर्यंत.
भाषणकलेसाठी आवश्यक कौशल्यांचे महत्त्व ठसवण्यासाठी लेखकाकडून सामान्य माणसाला तोंड द्यावे लागणारे प्रसंग आणि निवडक उदाहरणांचे दाखले दिले आहेत.

काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली आणि पर्वतासारखी अचल खालील तत्त्वे तुम्हाला मदतीचा हात देतील :
संयम आणि आत्मविश्वास मिळवा
स्मरणशक्ती तल्लख करा
भाषणाची सुरुवात परिणामकारक आणि शेवट छाप पाडणारा करा
श्रोत्यांच्या मनात उत्सुकता जागवा
शत्रुत्व न मिळवता वादविवादात जिंका

व्यावसायिक प्रशिक्षक असलेल्या लेखकाच्या अनेक वर्षांच्या अनुभवाचे सार या पुस्तकातून समजून घ्या. तुमचा आत्मविश्वास परत मिळवा आणि लोकांसमोर भाषण करण्याच्या भीतीवर नियंत्रण मिळवा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “How to Win Friends and Influence People | Develop Self-Confidence”

Your email address will not be published. Required fields are marked *