fbpx

Jidda Asavi Tar Ashi | जिद्द असावी तर अशी!

₹150

128Pages
AUTHOR :- N. Raghuraman
ISBN :- 9789352201495

Share On :

Description

मॅनेजमेंट… आजच्या युगातला एक महत्त्वाचा शब्द. एकाच शब्दाचे किती वेगवेगळे कंगोरे असतात ना…? अगदी कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनमध्ये करिअर करण्यापासून ते गृहिणीने घर सांभाळण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी मॅनेजमेंटची आवर्जून मदत होते. प्रत्येक माणसाची आपापल्या आयुष्यात स्वत:ची अशी काही स्वप्नं असतात; परंतु ती पूर्ण करायला अनुकूल परिस्थिती असतेच असं नाही.
जगात अशा व्यक्तींची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी शून्यातून विश्व उभं केलं. तसेच सुख पायाशी लोळण घेत असताना करिअरच्या, व्यवसायाच्या वेगळ्या वाटा चोखाळण्याचं धारिष्ट्यही अनेकांनी दाखवलं. मुख्य म्हणजे त्यात चिकाटीनं आणि जिद्दीनं यशही मिळवलं.
या पुस्तकातून तुम्हाला तुमच्यासारखीच सर्वसामान्य माणसं भेटतील. त्यांचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण हेच की, आपल्या जगण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मॅनेजमेंटची सूत्रंच आपल्यासमोर उभी केली.
प्रख्यात मॅनेजमेंट गुरू एन. रघुरामन यांनी प्रेरणेचा महास्रोतच या साऱ्या व्यक्तींच्या रूपाने वाचकांसमोर खुला केला आहे.
हे पुस्तक कोणासाठी? तर आपल्या स्वप्नांची दुनिया उभी करू पाहणाऱ्या अगदी नवतरुणांपासून ते निवृत्ती घेतलेल्या नव’तरुणांपर्यंत सर्वांसाठीच…!

या पुस्तकात काय वाचाल?
• तुमच्या आवडीचे कार्यक्षेत्र कसे निवडाल?
• तुमच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी व्यवस्थापन सूत्रे
• आधुनिक व्यवसायांच्या प्रेरक जन्मकहाण्या
• ‘मेक इन इंडिया’ आणि आपण

Additional information

About Author

एन. रघुरामन
मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केलेले आणि आय.आय.टी. (SOM) मुंबईचे माजी विद्यार्थी असलेले एन. रघुरामन हे ख्यातनाम पत्रकार आहेत. पत्रकारितेच्या ३० वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी 'इंडियन एक्स्प्रेस', 'डी.एन.ए.' तसेच 'दैनिक भास्कर'सारख्या राष्ट्रीय वृत्तपत्रांचे संपादक म्हणून कार्य केले आहे.
दैनिक भास्करच्या सर्व आवृत्त्यांमधून प्रकाशित होणारा त्यांचा दैनिक स्तंभ मॅनेजमेंट फंडा' देशभरात लोकप्रिय आहे. तो मराठी, गुजराती आणि हिंदी या भाषांमधून दररोज सुमारे तीन कोटी वाचकांद्वारे वाचला जातो. सामान्य व्यक्तींनी गाजवलेल्या असामान्य कर्तृत्वाच्या सत्यकथा आणि जीवनातील साधेपणाचे चित्रण ही या स्तंभाच्या यशामागील मुख्य कारणे आहेत.
एन. रघुरामन एक ओजस्वी, प्रेरणादायी आणि प्रभावी वक्ते आहेत. त्यांच्याद्वारे लिहिल्या गेलेल्या सर्वच गोष्टींमधून आपल्याला आनंदी आणि यशस्वी जगण्याची प्रेरणा मिळते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Jidda Asavi Tar Ashi | जिद्द असावी तर अशी!”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat