Description
” जे.आर.डी….
जे भारतासाठी उत्तम, तेच टाटांसाठी!’ अशा उदात्त विचारसरणीसह तब्बल दीडशे वर्षांचा संपन्न वारसा असलेल्या टाटा उद्योगसमूहाची धुरा ज्या खांद्यांनी अर्धशतकाहून अधिक काळ समर्थपणे वाहिली…
आदर्श उद्योजकतेचे आणि व्यक्तित्वाचे मानदंड ज्यांनी आपल्या उन्नत कृतींतून उभारले…
विशाल उद्योगसमूहाद्वारे संपत्तीनिर्मिती हाच देशसेवेचा मार्ग निवडून भारतीय उद्योगक्षेत्राला जागतिक अर्थक्षितिजावर प्रतिष्ठा दिली…
त्या जहांगीर रतन दादाभॉय टाटा यांनी आपल्या प्रखर सामाजिक आणि नैतिक जाणिवांतूनच जीवनाचा मोक्ष साधला…
त्यांच्या ‘अपत्या’नं, अर्थात एअर इंडियानं, त्यांच्या निधनानंतर पुढील सार्थ शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली…
“त्यांनी आकाशाला स्पर्श केला आणि आकाशही हसलं. त्यांनी आपले बाहू पसरले आणि अवघं जग कवेत घेतलं.
त्यांच्या दूरदृष्टीनं व्यक्ती आणि संस्था खूप मोठ्या झाल्या.” आपल्या अगणित संस्थांबरोबरच अवघ्या देशाला प्रगतीची वाट दाखवणार्या एका सर्वकालीन महान उद्योगपतीचं वेधक चरित्र.
————————————————————————————————————————–
सुमारे १५० वर्षांच्यी उद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रुपचा य होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुकुट आहे.
ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता या बाबी टाटा ग्रूपला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला.
रतन टाटा यांनी अतिशय कुशलतेने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या टेकओव्हर करतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांत दमदारपणे आघाडी घेतली.
टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला.
रतन टाटा यांनी आपल्या निर्णयक्षमतेने आणि कौशल्याने अतिशय अवाढव्य असलेल्या टाटा ग्रुपमध्ये सळाळते चैतन्य निर्माण करून तारुण्य फुकले.
अतिशय सहजतेने अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या टाटा यांचे अवघे जीवनच प्रेरणादायी आहे.
नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास साधण्याची परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे.
सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक लाखाची जिसकावर्णन तयार करण्याचा संकल्प करून तो प्रत्यक्षात उतरविणारे रतन टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी आहे.
रतन टाटा यांच्या संपूर्ण कारकीर्दीचे ओघवत्या शैलीत लिहिलेले प्रेरणादायी चरित्र.”
Reviews
There are no reviews yet.