fbpx

Kaat | Kalokhi Pournima

₹475

360 Pages
AUTHOR :- Narayan Dharap
ISBN :- 978-9352206483

Share On :

Description

“रात्री केव्हातरी खूप उशिरा तिला झोप लागली होती. सकाळी जाग आली तेव्हा डोळे चुरचुरत होते. जिभेवर एखादी कडवट चव रेंगाळावी तसं काहीतरी वाईट झाल्याची भावना मनात होती.

काल रात्री मनाने खूप निर्धाराचा पवित्रा घेतला होता; पण वाळूतला किल्लाच तो! एका भरतीबरोबर भुईसपाट झाला होता.
मनाला आलेला विफलपणा, पुढच्या आयुष्यातला एकटेपणा हे सगळं तिला सहन होणार होतं का? इतकी वर्षं ती शिणली, कष्टली… हाती काय काय राहिलं होतं? सागराचं पाणी ओंजळीतून गळून जावं तशी सर्व नाती गळून गेली होती.

शेवटी शेवटी ती एकटी, ती एकटीच राहिली होती. निष्काम कर्म- उच्चारायला शब्द फार सोपे; पण आचरणात महाकठीण.
वेळेचं चक्र घरंगळत चाललंच होतं. आयुष्यातून कोणालाच सुटका नव्हती.

मनासारखं होत असलं म्हणजे दिवसांची यादच राहत नाही.
आणि असं काही विपरीत घडलं की, क्षणाक्षणाचा बोजा असह्य होतो.

एकटीचे हात तर अति दुर्बल होतात. एकेका क्षणाचं हे वजन, मग सेकंदाचे तास, तासांचे दिवस, दिवसांची वर्ष… ती अजस्र रास पाहूनच जीव दडपून जातो.
असं वाटतं या रात्रीखाली शरीर पिंजून जाणार आहे… त्याचा चेंदामेंदा होऊन जाणार आहे.”

————————————————————————————————————————–

पडळ भरू लागली. शेवटी शेवटी आतून ओरडण्याचा, किंचाळण्याचा, रडण्याचा आवाज आला असे म्हणतात; पण तो काळच क्रूर होता.
भालदारांनी शेवटी शेवटी आत ढोसण्यासाठी हातातील भाल्यांचाही उपयोग केला असे म्हणतात.

खालचा मजला भरल्यावर त्यांनी माळा भरायला सुरुवात केली. अजूनही सारखा ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येत होता.
जानकीबाई तेथेच रडत, विनवणी करीत बसली होती. शेवटी ते पडवीतले ओरडणे न ऐकवून ती अडखळत अडखळत निघून गेली.

असे म्हणतात की, त्या एका रात्रीत ती कल्पनेबाहेर बदलली.
तिचे केस पिकले, हातपाय कापायला लागले, नजरेत एक प्रकारचा अस्थिरपणा आला. रात्रीची झोप पार उडाली.

तिने महाल सोडून जायचा फार प्रयत्न केला; पण मग तिला त्र्यंबकजीच्या स्वभावाची खरी कल्पना आली. तिला महालात कैदी करण्यात आले होते.
ज्या अनामिक सृष्टीला ती दूर लोटू पाहत होती, त्यात ती शेवटी गुरफटली गेलीच.

एका रात्री तिच्या खोलीतून मोठमोठ्या किंचाळ्या ऐकू आल्या. गडीमाणसे आत गेली तेव्हा ती एका कोपऱ्यात अंग चोरून उभी होती व सारखे काहीतरी दूर लोटण्याचा प्रयत्न करीत होती. डोळे भानावर नव्हते व तोंडाला फेस आला होता.

ती सर्वांची ओळख विसरली होती. वैद्य आले; पण त्यांचा काढा, प्राश, गुटिका कशाचाही उपयोग झाला नाही.
तोंडात काही घातले की ती लागलीच ‘थू:! थू:!’ करून बाहेर थुंकायची.
शेवटी काळालाच तिची दया आली व तिची या जगातून सुटका झाली.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kaat | Kalokhi Pournima”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat