Description
काचेला डोळे टेकवून नलिनी बाहेरच्या अंधाऱ्या सृष्टीवर नजर खिळवून बसली होती.
काचेत अस्पष्टसे प्रतिबिंब दिसत होते; पण त्या प्रतिबिंबावर बाहेरची सरकणारी, अज्ञात ठिणग्यांनी फुललेली भयानक काळी रात्र आक्रमण करीत होती.
तिला वाटले, आपल्या आयुष्याचीही या क्षणी हीच गत झालेली आहे. रोजचे सरावाचे जीवन एकदम धूसर, काचेवरच्या प्रतिबिंबासारखे भ्रामक झाले आहेपायाखालचा आसरा सरकायला लागला आहे- आणि या रहस्यमय रात्रीसारखेच काहीतरी अज्ञात, निष्ठुर, अगम्य काहीतरी आपल्या आयुष्यावर आक्रमण करीत आहे – आपले लहानसे जग अंधारात बुडून नामशेष होणार आहे.
या विचाराने असेल किंवा रात्रीच्या गारव्याने असेल, तिचे सर्व अंग एकदम शहारून उठले…
कोण होती ही नलिनी? कसल्या अनामिक संकटाने गांगरून गेली होती? स्वप्नात रममाण होण्याच्या काळात ती भीतीने का गोठून गेली होती? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यमय लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी जरूर वाचावी अशी कादंबरी.
————————————————————————————————————————–
चेटकीण’ ही कादंबरीविविध प्रकारच्या गूढतेने खच्चून भरलेली आहे. या कादंबरीतील अनेक प्रसंग आपल्या वास्तविक जीवनात घडल्याचे आपण ऐकलेले असते; पण बघितलेले किंवा अनुभवलेले नसते.
नेमकी हीच प्रचीती या पुस्तकातून येते. या कादंबरीला आभासी विश्वाची एक मुक्त सफरच म्हणावी लागेल.
गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू.
त्या वास्तूत अनाकलनीय घटना घडतात. या सर्व घटना मानवाच्या आकलनापलीकडे आणि आवाक्याबाहेरच्या आहेत.
या वास्तूत एक एक व्यक्ती त्या अनाकलनीय शक्तीला कशी सामोरी जाते आणि कशी गडप होत जाते; पुढे असे घडणार आहे असे माहीत असूनसुद्धा! तर काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि ती वास्तू पवित्र होते, पिशाच्च मुक्त होते.
Reviews
There are no reviews yet.