fbpx

Lifestyle | लाईफस्टाईल

₹299

288Pages
AUTHOR :- Rama Marathe
ISBN :- 9789352201778

Share On :

Description

तुमची ‘लाईफस्टाईल’ कशी असावी?
हे ठरवायचं तुमचं तुम्हीच!
तो अधिकार आणि स्वातंत्र्य फक्त तुम्हालाच,
इतर कुणालाही नाही.

… पण हे ठरविण्यासाठी आणि उभारण्यासाठी जो
विचारधारणांचा मजबूत आधार हवा – तो ‘धारण’
म्हणजे हे पुस्तक!

पूर्वी घराचा तोल सांभाळणारा
जो मध्यवर्ती खांब असायचा
त्याला ‘धारण’ म्हणत असत.
या पुस्तकातील मूलगामी चिंतन आणि संकल्पना
तुम्हाला जीवनाचा तोल सांभाळायला मदत करतील.

एकविसाव्या शतकातील बदलती जीवनशैली,
पतिपत्नी व इतर नातेसंबंध, मुलांचं संगोपन आणि
व्यक्तिमत्त्वविकास, संस्कृती, आरोग्य, आहार,
वेळ-श्रम-पैसा यांचं गणित, करिअर, संस्कार,
वृद्धापकाळाचं नियोजन, अध्यात्म, पर्यावरण,
तणाव मुक्ती, टाईम मॅनेजमेंट… इत्यादी.

अशा अनेक बाबतीत ज्ञान आणि भान आणणारं,
‘डोळे उघडणारं’ पुस्तक!

Additional information

About Author

डॉ. रमा मराठे
M.D.M.B.A., M.Sc. Ph.D. (Psychology)
डॉ. रमा मराठे विख्यात डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ, लेखिका आणि कवयित्री आहेत,
त्यांनी लिहिलेल्या 'औषधाविना आरोग्य' व 'ब्रेन प्रोग्रॅमिंग' या पुस्तकांची केंद्र सरकारच्या 'भारतीय भाषा संस्थान', म्हैसूरद्वारा भारतभर वितरणासाठी निवड करण्यात आली.
भारतातील अनेक शहरांत मानसशास्त्रातील क्लिष्ट संकल्पना सुगमरीतीने स्पष्ट करणारी व्याख्याने व कार्यशाळा त्या घेत असतात.
त्यांच्या आकाशवाणी, दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम व मुलाखती झाल्या आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्याख्याने तसेच कथाकथनाचे व स्वरचित काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम झाले आहेत.
विश्व इन्स्टिट्यूट ऑफ पॉझिटिव्ह सायकॉलॉजीतर्फे विद्यार्थी, पालक, शिक्षक, उद्योजक, इंडस्ट्रीज या सर्वांसाठी मराठी व इंग्रजी माध्यमातून समुपदेशन, व्याख्याने आणि कार्यशाळा; तसेच वैयक्तिक मानसशास्त्रीय चाचण्या, करिअर व व्यक्तिमत्त्वविकास याविषयी डॉ. रमा मराठे मार्गदर्शन करतात.
email: drmaethel@gmail.com, drmarthel@rediffmail.com

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Lifestyle | लाईफस्टाईल”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat