fbpx

Luchai | लुचाई

₹325

272Pages
AUTHOR :- Narayan Dharap
ISBN :- 9789352202072

Share On :

Description

‘अहो माझे बाप, आता माझ्यावर कृया करा.
माशांचे महाराज, आता माझ्यावर कृपा करा.
आता मी तुमच्यासाठी विदीर्ण शरीर, सडलेलं मांस,
कुजके दुर्गंधीयुक्त मांस आणलं आहे.
तुमची कृपादृष्टी व्हावी म्हणून मी नरबळी दिला आहे.
मी शुद्ध नरबळी दिला आहे. त्याचा स्वीकार करा.
त्या घासानं तुप्त व्हा. ही जागा मी तुमच्यासाठी निवडली
त्या या जागेवर मी तुमची खूण केली आहे.
त्या या जागेला तुमच्या नावाचा मान दिला आहे. त्या या जागी प्रकट व्हा,
त्या या जागी मला खूण दाखवा, त्या या जागी मला प्रेरणा द्या.
मी तुमच्या कार्याची सुरूवात करीन. अहो माझे बाप, आता घास घ्या.’
त्याच्या दोन्ही हातांवरचं वस्त्र गळून खाली पडलं.
त्याच्या दोन्ही हातांवर एका लहान मुलाचा विश्चल देह होता.
तो वाकून त्यानं सावकाश खाली ठेवला.
तो दोन पावलं मागं सरला.
आधीचीच शांतता. आता तर ती आणखी गडद झाली.
वारा थांबला. जणू हवेतल्या सर्व काणांचीही हालचाल थांबली.
काहीतरी झालं – शब्दांत वर्णन करता येण्यापलीकडचं.
खडकावरच्या मृत शरीराचं मासं काळं-निळं पडलं,
वितळल्यासारखं प्रवाही झालं, त्याचे ओघळ वाहायला लागले,
उकळल्यासारखे त्यात बुडबुडे उठायला लागले-
आणि तो काळा लगदा खडकात शोषला जायला लागला.
‘सक्! सक्! सक्!’ आवाज येत होता.
पाणाळलेलं अस्थी – मांस- मज्जा त्वचा-रूधीर शोषलं जात होतं.
शेवटी तिथं फक्त एक काळा डाग राहिला-
न ओळखता येण्यासारखा…

Additional information

About Author

भयकथांचा अनभिषिक्त सम्राट: नारायण गोपाळ धारप
जन्म : २७ ऑगस्ट १९२५
शिक्षण : रसायनशास्त्रात बी. एस्सी टेक (मुंबई विद्यापीठ)
कार्यक्षेत्र : मराठी साहित्यिक
साहित्य प्रकार : कादंबरी, रहस्यकथा, भयकथा, गुढकथा, विज्ञानकथा
मृत्यू : १८ ऑगस्ट २००८ पुणे

धारपांविषयी थोडेसे :
व्यवसायाच्या निमित्ताने काही वर्षे अमेरिकेत राहिलेले नारायण धारप हे नंतर पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला आणि त्याचबरोबर लेखनासही सुरुवात केली. गुढकथा, भयकथा, रहस्यकथा, विज्ञानकथा हे विविध साहित्य प्रकार त्यांनी अतिशय समर्थपणे हाताळले. मराठी साहित्यात रहस्यमय, भयग्रस्त गुढकथांचे आणि कादंबऱ्यांचे दालन समृद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत. त्यात नारायण धारपांचे नाव अव्वल आहे. त्यांनी लिहिलेले 'समर्थ' हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गुढकथांनी एक काळ गाजवला. त्यांच्या 'अनोळखी दिशा' या गुढकथांवर आधारित पुस्तकावरून एक मालिका इ.स. २०११ मध्ये स्टारप्रवाह या मराठी वाहिनीवर प्रदर्शित झाली. त्याचबरोबर त्यांच्या एका कथेवर आधारित असलेली 'ग्रहण' ही मालिकाही खूप गाजली. त्यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन आनंद राय यांनी २०१८ मध्ये 'तुंबाड' या चित्रपटाची निर्मिती केली, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले होते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Luchai | लुचाई”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat