Description
जनित्राचं चाक पिसाटासारखं गरगरत होतं. त्याच्या ठिणग्यांचा प्रकाश पडत होता. त्या प्रकाशात मला त्या प्राण्याचा चेहरा दिसला. ओठ मागे गेले होते. आणि दात एका क्रूर हास्यात विचकले होते.
तो चेहरा एका बेभान, हिंस्र पिसाट पशूचा होता!
फाटक्या बँडेजमध्ये गुंडाळलेल्या त्या जाडजूड हाताचा माझ्या मानेभोवती विळखा पडला आणि एका हिसक्यासरशी मी प्रयोगशाळेत खेचला गेलो.
केवढा दैवदुर्विलास! इतकी प्रगती झाल्यावर जे मी निर्माण केलं होतं त्याच्याच हातून माझा नाश व्हावा… निसर्गाच्या पंचमहाभूतांनी काहीतरी खेळ करावा, एखादी विकृती अपघाताने जन्माला यावी आणि त्या हाती मला मरण यावे…!
कोण आहे हा बॅरेन फ्रँकेन्स्टाइन? प्रयोगशाळेत तो कसले प्रयोग करत होता? हिंस्र, पिसाट, राक्षसी मानवाचा त्याला कशामुळे सामना करावा लागला?
या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी प्रस्तुत कादंबरी जरूर वाचा.
Reviews
There are no reviews yet.