fbpx

Maharaja Sayajirao Ani Pune Shaharache Prem | महाराजा सयाजीराव आणि पुणे शहराचे प्रेम

₹200

192Pages

AUTHOR :- Baba Bhand
ISBN :- 9789352202614

Share On :

Description

महाराजा सयाजीराव गायकवाड हे प्रज्ञावंत राजे असल्यामुळे ज्ञानात्मक प्रबोधनातून सामाजिक परिवर्तनावर त्यांचा भर होता. असे परिवर्तन करू पाहणाऱ्या प्रत्येक समाजधुरिणांना त्यांचे पाठबळ होते.
महाराष्ट्राबाहेर बडोद्यात एक मराठी राजा समाजपरिवर्तनाचे काम करतो आहे याकडे सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील मंडळीचे लक्ष होते.
सयाजीरावांच्या राज्याभिषेकापासून पुणे आणि महाराजांचे ऋणानुबंध होते. न्या. म. गो. रानडे, महात्मा जोतीराव फुले, लोकमान्य टिळक, महर्षी वि. रा. शिंदे, महर्षी धों. के. कर्वे, गंगाराम म्हस्के, बाबूराव जगताप या मंडळींना आणि डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन महाविद्यालय, श्री शिवाजी शिक्षण संस्था, भांडारकर प्राच्य विद्या संस्था, भारत इतिहास संशोधन मंडळ अशा अनेक संस्था आणि व्यक्तींना महाराजांचा राजाश्रय होता. महाराजांना शिक्षण आणि समाजपरिवर्तनाविषयी आवड असल्याने पुण्यात या अंगाने घडणाऱ्या प्रत्येक घटना-प्रसंगाकडे त्यांचे लक्ष होते. पुण्यातील या जाणकार मंडळींनाही महाराजांबद्दल आदर होता.
महाराजांना या व्यक्तींबद्दल आणि संस्थांबद्दल विशेष आस्था होती. त्यामुळे त्यांना ते तन मन धनाने मदत करत होते. महाराजांचे पुणे शहराबद्दलचे प्रेम आणि ऋणानुबंध ‘महाराजा सयाजीराव आणि पुणे शहराचे प्रेम’ या ग्रंथातून समोर येत आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Maharaja Sayajirao Ani Pune Shaharache Prem | महाराजा सयाजीराव आणि पुणे शहराचे प्रेम”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat