Mi Yashasvi Honarach | मी यशस्वी होणारच

₹175

168Pages
AUTHOR :- Prabhakar Bhore
ISBN :- 9788177866209

Share On :

Description

मी यशस्वी होणारच!’ हे प्रभाकर भोरे लिखित पुस्तक त्यांच्या जीवनातील अनुभवांचीच जणू शिदोरी आहे. तसं पाहिलं तर हे पुस्तक सर्वांसाठीच आहे. ज्यांना जीवनात यश मिळवायचं आहे, मग ते परीक्षेला बसणारे असोत किंवा नसोत; त्या प्रत्येकाला हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल. नुसतं परीक्षेत सुयश कसं मिळवावं हे सांगणं हा या पुस्तकाचा उद्देश नाही, तर हे पुस्तक तुम्हाला नवीन ध्येय आखण्यास, स्वत:बद्दल आणि स्वत:च्या जीवनाबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास मदत करील. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते हे सांगण्याच्या उदात्त हेतूनं या पुस्तकाचं लिखाण केलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तसंच त्यांच्या पालकांसाठीही प्रस्तुत पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल.
पुस्तकाची वैशिष्ट्ये :
• ‘मी यशस्वी होणारच!’ हे पुस्तक वाचकांमध्ये दुर्दम्य आत्मविश्वास
निर्माण केल्याशिवाय राहणार नाही.
• या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणातून वाचकास उत्साह, चैतन्य व नवीन
दृष्टी मिळेल.
यशाचे शिखर अडचणींच्या डोंगरावर चढून कसे सर करता येईल हे लेखकाने सुंदर, सहज आणि सोदाहरण पटवून सांगितले आहे.
• प्रस्तुत पुस्तकात आत्मपरीक्षण, कला, कल्पना व विचारशक्ती यांविषयीचे सखोल विवेचन दिले आहे.
• स्वयंप्रेरणा, मानसिकता, आत्मविश्वास, एकाग्रता, वेळेचे महत्त्व, अंतर्मनाची शक्ती तसेच स्वयंप्रेरित अभ्यासाचे तंत्र या संदर्भातही हे पुस्तक बहुमोल मार्गदर्शन करते.

Additional information

About Author

"परिचय
इंजिनिअर प्रभाकर बबनराव भोरे
शिक्षण :
• परेल नाइट हायस्कूल, मुंबई
• डी. सी. ई. ए. एम. आय. ई. (सेक्शन ए आणि बी)
• बी. ई. (सिव्हिल) पदवी विशेष प्रावीण्यासह
नोकरी :
• १५ वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रातील प्राध्यापक म्हणून कार्य
• एम.पी.एस.सी. तर्फे प्राध्यापक म्हणून निवड
• १९७९ साली एम.पी.एस.सी. परीक्षेत १७ वा क्रमांक. असिस्टंट
इंजिनिअर म्हणून निवड. नंतर कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती
• २२ वर्षे महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात असिस्टंट इंजिनिअर
आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून अनुभव
• २८ फेब्रुवारी २००२ मध्ये प्राचार्य व कार्यकारी अभियंता या पदांवरून
सेवानिवृत्त.
व्याख्याने :
• शाळा, कॉलेज, विविध प्रशिक्षण केंद्रांत तांत्रिक, व्यक्तिमत्त्व व स्मरणशक्ती
विकास या विषयांवर व्याख्याने.
पुरस्कार :
• ५ सप्टेंबर २०१४ रोजी नाशिक येथील 'इंजिनिअरिंग अॅण्ड आर्किटेक्चर
असोसिएशन' यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार.
"

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mi Yashasvi Honarach | मी यशस्वी होणारच”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat