fbpx

Mossad | मोसाद

₹399

296 Pages

AUTHOR :- Ronald Payne
ISBN :- ‎ 9789352203697

Share On :

Description

उत्कृष्टपणे सांगितलेले कथानक’
– डेली एक्स्प्रेस, लंडन

जगातील अन्य कोणत्याही देशाची गुप्तचर यंत्रणा इस्रायलच्या मोसादइतकी मिथक आणि रहस्यांनी वेढलेली नाही. सीआयएने ‘जगातील सर्वोत्कृष्ट गुप्तचर संस्था’ असे मोसादबद्दल उद्गार काढलेले आहेत. मोसादचे नाव निघाले की, इस्रायलचे मित्र आदराने बघतात तर शत्रूच्या मनात भय उत्पन्न होते. खरंतर १९४०मधील इस्रायलच्या निर्मितीपासून, मोसाद हे त्यांच्या जगण्याच्या सततच्या संघर्षातले महत्त्वाचे शस्त्र आहे.
मोसादने घडवून आणलेल्या एंटेबे विमानतळावरील धडक कारवाईमध्ये केलेली इस्रायली ओलिसांची नेत्रदीपक सुटका आजसुद्धा गुप्तहेरांच्या जगात एक चमत्कार समजली जाते. तसेच इराकची अणुभट्टी नष्ट करण्यासाठी ज्याप्रकारे मोसाद एजंट्सनी इस्रायली वायुसेनेला बॉम्बरचे लक्ष्य निश्चित करून दिले होते, ती कामगिरीदेखील उल्लेखनीय आहे.
हे पुस्तक म्हणजे मोसादचा पहिला संपूर्ण इतिहास होय. अंगावर शहारे आणणाऱ्या एखाद्या थ्रिलरसारखा हा इतिहास वाटतो; परंतु त्यातील प्रत्येक शब्द खरा आहे. अतिशय तटस्थ राहून मोसादमधील ऐतिहासिक घटनांच्या कारणांची आणि परिणामांची मीमांसा करण्यात लेखक यशस्वी ठरतात. आणि हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
आपल्या नवनिर्मित देशासाठी प्राणालाही तुच्छ लेखणाऱ्या मोसाद एजंट्सच्या विविध कारवाया आणि दहशतवादविरोधी तंत्रं यांच्या अविश्वसनीय कथा या पुस्तकात आहेत. गुप्तहेरांचे आयुष्य कितीही कठीण असले तरी त्यांची देशभक्ती किती प्रखर असू शकते हे या कथा सांगतात.

Additional information

About Author

रोनाल्ड स्टेव्हली पायने
(६ फेब्रुवारी १९२६ – २५ मे २०१३)
रोनाल्ड पायने हे हेरगिरी आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करणारे प्रतिष्ठित ब्रिटिश वृत्तपत्र वार्ताहर होते. त्यांनी १९५०च्या दशकात पूर्वेतील देशांवर लेख लिहिण्यास सुरुवात केली. कर्नल गद्दाफी यांची त्यांनी घेतलेली मुलाखतही चांगलीच गाजली. दहशतवाद आणि युद्धावर त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके सुप्रसिद्ध आहेत.

लेखकाची गाजलेली पुस्तके :
१. प्रायव्हेट स्पाइज : द सीक्रेट वर्ल्ड ऑफ इंडस्ट्रिअल एस्पिओनेज, १९६७
२. द कार्लोस कॉम्प्लेक्स: अ पॅटर्न ऑफ व्हायोलन्स हे ख्रिस्तोफर डॉब्सन बरोबर लिहिलेले पुस्तक, १९७७
३. द टेररिस्ट, १९७९
४. काउंटरअटॅक : द वेस्ट्स बॅटल अगेन्स्ट टेररिस्ट, १९८२
५. द फॉकलँड्स कन्फ्लिक्ट, १९८२
६. हूज हू इन एस्पिओनेज, १९८४
७. द नेव्हर एडिंग वॉर : टेररिझम इन द एटीज, १९८७
८. मोसाद : इस्रायल्स मोस्ट सीक्रेट सर्व्हिस, १९९०

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mossad | मोसाद”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat