fbpx

Mukesh Ambani | Narayan Murthy

₹375

288 Pages
AUTHOR :- Rahul Singhal, Sudhir Rashingkar
ISBN :- 978-9352204458

Share On :

Description

नारायण मूर्ती : एक प्रेरणादायी व्यक्तितत्त्व. उद्योग व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सॉफटवेअर उद्योगाची त्यांनी या देशात मुहूर्तमेढ रोवली. देशातील बहुतेक उद्योजक जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेला विरोध करीत असताना मूर्ती यांनी जागतिकीकरणाचा आपल्या उद्योगाच्या भरभराटीसाठी उपयोग करून घेतला.
एक व्यक्ती म्हणूनही मूर्ती यांचे जीवन प्रेरणादायी आहे. डोक्याने उद्योजक आणि हृदयाने समाजवादी असलेल्या मूर्ती यांनी आपल्या उद्योगातील कर्मचार्‍यांना भागधारक होण्याची संधी उपलब्ध करून दिली. आपल्या वैयक्तिक संपत्तीचा जास्तीत जास्त वाटा समाजासाठी, विद्यार्थी आणि गोरगरिबांच्या विकासासाठी खर्च करून मूर्ती यांनी वेगळा आदर्श घालून दिला आहे.
यशस्वी उद्योजक आणि करोडो रूपयांच्या संपत्तीचा मालक बनल्यानंतरही मूर्ती यांनी साधी राहण सोडली नाही. समाजकारणात महात्मा गांधीनी घालून दिलेले आदर्श औद्योगिक जीवनात जपले.
तरुणांना दिशो देणारे विचार समजून घेण्यासाठी मूर्ती यांचे चरित्र मुळातूनच वाचायला हवे.
———————————————————————————————————————–
“सर्वाधिक स्वस्त, तरीही गुणवत्तेने श्रेष्ठ वस्तूंचे उत्पादन करणे हा माझा शब्द आहे.”
– मुकेश अंबानी
एखादा विश्वव्यापी उद्योग उभारण्यामागे कित्येक पिढ्यांची दूरदृष्टी वा मेहनत असते.
मात्र एक नव्हे तर असे अनेक प्रचंड उद्योगसमूह उभारण्याचे कार्य मुकेश अंबानी यांनी केले आहे.
वयाच्या 18 व्या वर्षीच कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्त झालेल्या मुकेश यांनी वडिलांच्या आग्रहाखातर अमेरिकेतील उच्च शिक्षण अर्धवट सोडले.
लगेचच रिलायन्स कंपनीच्या पाताळगंगा इथल्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या उभारणीचे काम वयाच्या विशीतच यशस्वीरीत्या पूर्ण केले.
वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनामुळे त्यांनी कंपनीचा कारभार हाती घेतला.
नंतरच्या काही दशकांत त्यांनी विविध क्षेत्रांतील उद्योगात पर्दापण करून जगातील सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादीत वरचा क्रमांक पटकावला.
निष्ठावंत अधिकारी आणि कर्मचार्यांची मोठी फळी त्यांनी उभारली.
त्याचबरोबर क्रीडा, पर्यावरण, सेवाभावी कार्य, शिक्षण क्षेत्र यामध्येही मोलाचे योगदान दिले.
विशेष म्हणजे आपल्या पत्नीला आणि पुढच्या पिढीलाही हे सर्व कार्य पुढे नेण्यासाठी घडवले.
हे सर्व त्यांनी कसे घडवून आणले, कोणती व्यवस्थापन सूत्रे वापरली, त्यांच्या यशाच्या कार्यपद्धती काय आणि तरुण पिढीला ते कोणता संदेश देऊ इच्छितात याविषयी कॉर्पोरेट गुरू ‘मुकेश अंबानी’ या पुस्तकातून जाणून घ्या.
प्रथितयश लेखक डॉ. सुधीर राशिंगकर यांनी ते इथे ओघवत्या शैलीत विस्तृतपणे सांगितले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mukesh Ambani | Narayan Murthy”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat