fbpx

Options Trading | Price Action Trading

₹400

296 Pages
AUTHOR :- Mahesh Chandra Kaushik, Indrazith Shantharaj
ISBN :- 978-9352204496

Share On :

Description

ऑप्शन्सवर तुम्ही हजारो पुस्तकं वाचाल; पण या पुस्तकात जेवढे ज्ञान दिलेले आहे तेवढे इतर कोणत्याही पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही.
सगळे लेखक तुम्हाला ऑप्शन्सची माहिती, ऑप्शन्स ग्रीक्स वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतात.
मात्र कोणत्याही पुस्तकातून तुम्हाला ऑप्शन्स तंत्रांची माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ते सांगितले जात नाही, ज्याद्वारे एखादा अत्यंत तुटपुंजे उत्पन्न असणारा माणूसही ऑप्शन्स ट्रेडिंग करून श्रीमंत होऊ शकेल.
अद्ययावत माहिती असलेल्या या पुस्तकात ऑप्शन्सच्या बाराखडीपासून ते ऑप्शन्स ग्रीक्सपर्यंत सगळे काही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहे.
भारतीय स्टॉक मार्केट या विषयावर लिहिणार्या महेश कौशिक यांची पुस्तकं सर्वाधिक वाचली जातात. हेही त्यांनी लिहिलेले एक अप्रतिम पुस्तक आहे.
कौशिक क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावून सांगतात.
हे पुस्तकदेखील त्यांनी एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात लिहिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला ते वाचताना कुठेही कंटाळा येणार नाही.
एक सामान्य वेटर असलेला घिसूभाई या गोष्टीचा नायक आहे. प्रस्तुत पुस्तकात कौशिक घिसूभाईला ऑप्शन ट्रेडिंग कसे शिकवतात याचे उत्तम सादरीकरण केलेले आहे.
विज्ञान शाखेतून पदवीधर झालेल्या महेश चंद्र कौशिक यांनी आपल्या करिअरची सुरुवात खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून केली होती.
त्यानंतर राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारा राजस्थानमधील वाणिज्य कर विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
या पदावर पाच वर्षे कार्य केल्यानंतर त्यांची नियुक्ती महसूल विभागात टी. आर. ए. पदी झाली. या पदावर त्यांनी 2001 ते 2017 पर्यंत कार्य केले.
त्यानंतर त्यांना सहायक महसूल लेखा अधिकारी म्हणून बढती मिळाली. सध्या ते सिरोही येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत.
———————————————————————————————————————

तुम्ही ट्रेडिंगव्हयुमध्ये कधी कॅन्डलस्टिक चार्ट घेऊन :
मूव्हिंग अॅव्हरेज (MA), बोलिंजर बॅन्ड (BB) आणि PSAR हे सगळे इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?
RSI स्टॉकॅस्टिक्स, MACD, ADX हे सगळे सुप्त इंडिकेटर्स काढून टाकले आहेत का ?

विचार करा की, तुम्हाला अशा पद्धतीनं ट्रेड करता येईल का ?
हे अशक्य आहे असं तुम्हाला वाटेल; पण एक विसरू नका की, जवळपास सगळ्या इंडिकेटर्सचं अस्तित्व एकाच घटकावर अवलंबून असतं- ‘प्राइस.’ प्राइसमध्ये चढ-उतार झाला, तर या इंडिकेटर्समध्येही चढ-उतार होईल, बरोबर ? मग कशाचा अभ्यास करणं इष्ट होईल ? प्राइसचा का इंडिकेटर्सचा ? तुम्हीच विचार करू शकता.

प्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे काय ?
प्राइस ॲक्शन ट्रेडिंगचं एक तंत्र आहे. यामध्ये टेक्निकल इंडिकेटर्स किंवा इतर घटकांकडे लक्ष न देता, ट्रेडर शेअर बाजाराचा अंदाज घेतो आणि प्राइस, म्हणजेच किंमतीच्या चढ-उतारांच्या आधारावर त्याचे वैयक्तिक ट्रेडिंगविषयक निर्णय घेतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Options Trading | Price Action Trading”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat