Description
कोणतीही गोष्ट तुम्हाला मागे ओढू शकत नाही!
लोकांच्या सुप्तशक्तीची परिपूर्ती न होण्याचे प्रथम क्रमांकाचे कारण म्हणजे नकारात्मक विचार आणि भावना.
चांगली बातमी ही आहे की, तुमच्याजवळ हे बदलण्याची शक्ती आहे.
तुम्ही तुमच्यातील नकारात्मक भावना किंवा विचारांचे सकारात्मकतेमध्ये रूपांतर करू शकता.
या पुस्तकातील साध्या; पण शक्तिशाली पद्धती व तंत्रांचा वापर करून तुम्ही प्रत्येक समस्येला एका लाभात बदलू शकता,
आणि खरोखर एक असामान्य जीवन जगू शकता!
‘ज्या क्षणी ब्रायन यांनी मला त्यांच्या नवीन पुस्तकातील संदेश सांगितला त्या क्षणी मला कळाले की, मी हे पुस्तक मिळविले पाहिजे, वाचले पाहिजे आणि माझ्या मित्रांना त्याबद्दल सांगितले पाहिजे. मी तुम्हाला अशी शिफारस करेन की, तुम्ही हे पुस्तक विकत घ्या, वाचा आणि त्याचा वापर करा; कारण एक अधिक आनंदी, हर्षभरित जीवन केवळ काही तासांच्या अंतरावरच आहे.’
– डेव्हिड बाख, न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खपाच्या प्रथम क्रमांकावरील ‘दि ऑटोमॅटिक मिल्यनेअर’ या पुस्तकाचे लेखक व FinishRich.com चे संस्थापक
‘पॉझिटिव्ह थिंकिंग’ची जादू’ हे पुस्तक मला भयावर मात करण्याचे, नकोशा आठवणींना मनातून पुसून टाकण्याचे आणि माझ्या स्वप्नांच्या दिशेने क्षमाशीलता आणि सकारात्मकतेने पुढे वाटचाल करण्याचे नवे मार्ग दाखवेल असे आश्वासन ब्रायन यांनी दिले होते. म्हणून मी हे पुस्तक वाचून सकारात्मकतेकडे नेणाऱ्या त्यातील मार्गांचा अवलंब करण्याचे ठरवले. ही वाटचाल अवघड होती; पण अशक्य मात्र नव्हती. मी शिफारस करेन की, तुम्हीदेखील त्या मार्गाचा अवलंब करावा.’
– केन ब्लॅन्चार्ड, ‘द वन मिनिट मॅनेजर’ आणि ‘लीड विथ एल.यू.व्ही.’ या पुस्तकांचे सहलेखक
‘पॉझिटिव्ह थिंकिंग’ची जादू’ तुम्हाला यशस्वी जीवनासाठीची तुमची अमर्याद सुप्तशक्ती मुक्त कशी करावी हे दाखविते.’
– टी. हार्ह एकर, न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खपाच्या प्रथम क्रमांकावरील ‘सीक्रेट्स ऑफ द मिल्यनेअर माईंड’ या पुस्तकाचे लेखक
Reviews
There are no reviews yet.