fbpx

Madam Curie

₹200

192Pages
AUTHOR :- Vinodkumar Mishra
ISBN :- 9789352201105

Share On :

Description

पोलंडच्या एका अतिसामान्य कुटुंबात जन्मलेल्या मादाम क्यूरी विलक्षण प्रतिभावान, विदुषी आणि जगातील श्रेष्ठतम शास्त्रज्ञांपैकी एक होत्या.
• भौतिकशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवणारी प्रथम महिला
• दुसरा नोबेल पुरस्कार मिळवणारी प्रथम विदुषी
• फ्रान्समधील डॉक्टरेट मिळवणारी प्रथम महिला
• सॉरबॉन विद्यापीठातील पहिली महिला प्रोफेसर
अशी त्यांची ओळख सांगता येईल.
असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या मेरी क्यूरी यांना अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला. खुल्या, धोकादायक आणि असुविधाजनक शेडमध्ये अपुऱ्या उपकरणांच्या साहाय्याने त्यांनी ‘रेडियम’चा अद्भुत असा शोध लावला. केवळ संशोधनातच नव्हे तर दान व सेवेतही त्या अग्रेसर असत.
मादाम क्यूरी या एक महान शिक्षिकाही होत्या. त्यांनी अनेक विद्वान व्यक्तिमत्त्वं, शास्त्रज्ञ घडवले. आजच्या युवा पिढीने देखील विज्ञान व औद्योगिक क्षेत्रात अपूर्व योगदान देण्यासाठी आणि व संशोधनात नवे उच्चांक गाठण्यासाठी मादाम क्युरींचे चरित्र नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

Additional information

About Author

विनोद कुमार मिश्र
१२ जानेवारी १९६० रोजी जन्मलेले विनोद कुमार मिश्र केवळ तीन वर्षांचे असताना पोलिओग्रस्त झाले होते. ८० टक्के दिव्यांग असूनही आज ते कर्तृत्वाच्या शिखरावरील एक उत्तम उदाहरण बनले आहेत. सन १९८३ मध्ये त्यांनी रूरकी विद्यापीठातून (आयआयटी) इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार या विषयात पदवी मिळवली आणि नंतर एम. बी. ए. केले.
आतापर्यंत त्यांची ५० पुस्तके आणि ३०० पेक्षा जास्त लेख प्रकाशित झालेले आहेत. 'विकलांगता : समस्याएँ व समाधान,' 'विकलांग विभूतियों की जीवन-गाथाएँ', 'कमजोर तन, मजबूत मन', 'विकलांगों के लिए रोजगार', 'Eminent Disabled People of the World', 'Career Opportunities for the Disabled', 'विकलांगों के अधिकार', 'इक्कीसवीं सदी में विकलांगता', 'विकलांग स्वस्थ और आत्मनिर्भर कैसे बने', 'थॉमस अल्वा एडिसन', 'अल्बर्ट आइन्स्टाइन', 'सौर ऊर्जा', 'चार्ल्स डार्विन', 'लिओनार्दो द विंची', 'सचित्र विज्ञान विश्वकोश' (३ खंड ) तसेच 'अल्फ्रेड नोबेल' इ. पुस्तकांचा समावेश आहे. 'भारत में विज्ञान और भारतीय वैज्ञानिक', 'साधारण आविष्कारों की असाधारण सफलताएँ, 'वैज्ञानिक भारत का निर्माण' एवं 'अक्षय ऊर्जास्रोत' यासारखी विज्ञानाशी संबंधित महत्त्वाची पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
त्यांना राष्ट्रपतीपदक, हिंदी अकादमीतर्फे 'साहित्यिक कृती सन्मान', योजना आयोगातर्फे 'कौटिल्य पुरस्कार' आणि 'प्राकृतिक ऊर्जा पुरस्कार' यासारखे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. सध्या ते भारत सरकारच्या एका उद्योग प्रकल्पात मुख्य प्रबंधक म्हणून कार्यरत आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Madam Curie”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat