Description
तुमच्या अंतर्गत असणारी अमर्याद ऊर्जा तुम्हाला प्रोत्साहित करू शकते, रोगमुक्त आणि प्रेरित करू शकते; तसेच योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला सुखसमाधानाच्या, मुक्तीच्या, मनःशांतीच्या प्राप्तीसाठी योग्य मार्गावर नेऊन जीवनसाफल्याचा आणि परिपूर्णतेचा आनंद मिळवून देते.
विभिन्न क्षेत्रातील अनेक लोक प्रगतीच्या वाटेवर सातत्याने महान गोष्टी हस्तगत करण्यात यशस्वी होतात. ते शक्तिशाली, आरोग्यसंपन्न आणि उत्कट जीवनेच्छा बाळगून असतात. एवढेच नव्हे, तर मानवतेच्या कल्याणासाठी सर्वतोपरी झटत असतात. असे वाटते की, अशा कोणत्या तरी महान ऊर्जने ते भारलेले आहेत आणि ती ऊर्जाच त्यांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे.
आपल्या आयुष्यातील समस्या आणि विफलता यांना यशस्वीरीत्या तोंड देऊन त्यांच्यावर मात कशी करावी, याची शिकवण हे पुस्तक देईल. प्रत्येक समस्या दैवीकृपेने सुटू शकते आणि त्या समस्येवर निर्धारपूर्वक विजय मिळवून नव्या दिवसाची पहाट आणि समाधानकारक नवीन आयुष्य कसे साकारता येईल, याचा उलगडा या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण करेल.
या पुस्तकातून काय मिळेल?
नवीन मित्रांचा आणि हव्याहव्याशा लोकांचा सहवास.
वेगवेगळ्या धोक्यांपासून संरक्षण.
असाध्य समजल्या जाणाऱ्या व्याधींपासून रोगमुक्ती.
आत्मअवहेलना आणि स्वतःला सतत दोष देण्यापासून मुक्तता.
मुबलक संपत्ती, समाजमान्यता, मानसन्मान व मनापासून स्वागत, नवा जोम आणि आत्यंतिक उत्साह
वैवाहिक जीवनातील वैमनस्य दूर करून मनःशांती आणि सुख या परिवर्तनशील जगात निवांतपणाचा अनुभव
आणि या सर्वांपेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रार्थनेला मिळालेल्या इच्छित प्रतिसादाचा आनंद
Reviews
There are no reviews yet.