fbpx

Pratham Kramankachi Nivadak Bhashane | प्रथम क्रमांकाची निवडक भाषणे

₹175

136Pages
AUTHOR :- Geeta Kolhatkar
ISBN :- 9788177863918

Share On :

Description

शालेय परीक्षांमध्ये मिळणारी उच्च गुणवत्ता आयुष्याला तोंड देण्यासाठी पुरेशी नसते. जोपर्यंत विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत नाही तोपर्यंत विद्यार्थी आयुष्यातील आव्हानं स्वीकारण्यास पात्र होत नाही.
व्यक्तिमत्त्व विकासाच्या अनेक पद्धतींमध्ये वक्तृत्व कला ही फार उच्च दर्जाची पद्धत आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये मानली जाते.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विचारशक्तीला वळण लावण्याचं जे सामर्थ्य आपण मिळवतो ते शब्दांच्या पलीकडलं आहे.
तो आनंद, ते सामर्थ्य हे प्रत्येक वक्त्या विद्यार्थ्याला स्वतःला अनुभवता येतं.
कारण ही शक्ती हे सामर्थ्य प्रत्येकामध्ये असते आणि त्याचा विकास करण्यासाठी अशा वक्तृत्व स्पर्धांचा उपयोग करून घ्यायचा असतो. म्हणूनच या पुस्तकात प्रथम क्रमांकाची निवडक भाषणे दिली आहेत.
दिलेल्या भाषणांचे विषय जसेच्या तसे येतीलच असे नाही. त्यातून जर आज विषय आलेच तर नवीन संदर्भ घेणे आवश्यक आहे.
विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सुप्त शक्तीला चालना देण्यासाठी, वक्तृत्व फुलविण्यासाठी या भाषणांचा नक्कीच उपयोग होईल.

Additional information

About Author

"गीता कोलटकर – बेंबळकर
एम. एस्सी., बी. एड.
श्री गुजराती विद्या मंदिर, औरंगाबाद येथे २८ वर्षे अध्यापन. तरुण वयात जयप्रकाश नारायण, आचार्य विनोबा भावे, दादा धर्माधिकारी यांच्या विचारांच्या कार्यकर्त्या. 'तरुणांची दुष्काळाशी झुंज' या सर्वोदयी नेते गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या आंदोलनात सहभाग. वीरशैव धर्मातील अधिकारी व्यक्तीशी धर्माविषयी सखोल चर्चा, प्रा. सदाविजय आर्य, गं. बा. सरदार, एस. एम. जोशी, अॅड. भगवानराव देशपांडे या मान्यवरांशी सामाजिक बांधिलकीबद्दल सुसंवाद.
दोन्ही समाजांच्या विरोधात जाऊन, आंतरजातीय विवाह.
सहशिक्षिका म्हणून काम करीत असताना सतत अठ्ठावीस वर्षे विद्यार्थिवक्ते घडविले. बालनाट्य, महिला नाट्यस्पर्धेसाठी लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सक्रिय सदस्या.
"

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Pratham Kramankachi Nivadak Bhashane | प्रथम क्रमांकाची निवडक भाषणे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat