fbpx

Quiet | क्वाएट

₹399

360 Pages
AUTHOR :- Susan Cain
ISBN :- 978-9352204366

Share On :

Description

मूकपणे क्रांती घडवून आणणारे ’क्वाएट’
निसर्गत:च शांत आणि गंभीर किंवा संवेदनशील व्यक्तींकडे प्रदीर्घ काळापासून दुर्लक्ष करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे बोलण्यासारखेे फारसे काही नाही त्या व्यक्तीही मोठ्याने बोलून वरचढ ठरत असल्याचे आपण अनेकदा पाहतो. मात्र आता प्रत्येकाने लक्ष देऊन ऐकण्याची वेळ आली आहे. ही वेळ आहे अंतर्मुख व्यक्तींचे सामर्थ्य जोपासण्याची. ही वेळ आहे अंतर्मुख व्यक्तींचे शांततेचे महत्त्व समजून घेण्याची.
’’हे पुस्तक अंतर्मुखी स्वभावाच्या लोकांना स्वत:कडे एका संपूर्णत: नव्या प्रकाशात पाहण्यास भाग पाडेल.’’
– नाओमी वुल्फ
’’क्वाएटचा मध्यवर्ती सिद्धांत ताजी माहिती देणारा आणि महत्त्वाचा आहे. कदाचित ही वेळ आहे आपण सर्वांनी थांबून त्या शांततेच्या स्थिर आणि लहानशा आवाजाकडे लक्ष देण्याची.’’
– डेझी गुड्विन, संडे टाइम्स
’’लक्षणीय’’
– डेली मेल
’’समाजाचा अंतर्मुखींकडे पाहण्याचा दृठिकोन कायमस्वरूपी बदलणारे असामान्य पुस्तक.’’
– ठोचेन रुबिन, ’द हॅपिनेस प्रोजेक्ट’च्या लेखिका

Additional information

About Author

सुझन केन या ’क्वाएट’ या पुस्तकाच्या लेखिका असून हे पुस्तक ’संडे टाइम्स’ आणि ’न्यूयॉर्क टाइम्स’ बेस्ट सेलर आहे. या पुस्तकाचा तीसहून अधिक भाषांत अनुवाद झाला आहे. त्यांचे TED वरील व्याख्यान ऑनलाइन उपलब्ध झाल्यापासून ते तीस लाखांहून अधिक दर्शकांकडून पाहिले गेले आहे.
अंतर्मुखीत्व आणि लाजरेपणा यावरील त्यांचे लिखाण द न्यूयॉर्क टाइम्स, द गार्डियन, ओपरा मॅगझीन आणि सायकॉलॉजी टुडे यांच्या अंकांत प्रकाशित झाले आहे. केन यांनी रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स, मायक्रोसॉफ्ट व गूगल येथे व्याख्याने दिली आहेत आणि बीबीसी रेडियो 4, बीबीसी ब्रेकफास्ट, सीबीएस आणि एनपीआरमध्येदेखील त्यांनी कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांचे संशोधनपर कार्य टाइम्सचे मुखपृष्ठ, द डेली मेल, एफ्टी, अ‍ॅटलांटिक, जीक्यू, ग्राझिया, द न्यूयॉर्कर, वायर्ड, फास्ट कंपनी, फॉर्च्यून, फोर्ब्स, युएसए टुडे, द वॉशिंग्टन पोस्ट आणि सीएनएन व एतू.म्दस् मध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे.
त्या प्रिन्स्टन आणि हार्वर्ड विधी महाविद्यालयाच्या पदवीधर आहेत. आपले पती आणि दोन मुलांसह त्या हड्सन रिव्हर व्हॅली येथे वास्तव्यास आहेत.
http://www.thepowerofintroverts.com

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Quiet | क्वाएट”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat