Description
एका अशक्यप्राय, खडतर स्वप्नासाठी आपलं सबंध आयुष्य वाहून घ्यावं आणि शेवटी स्वप्नपूर्ती झाल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घ्यावा, ही तशी कविकल्पना वाटते; पण ही वस्तुस्थिती शत-प्रतिशत घडली आहे, स्वराज्यसारथी जिजाऊसाहेबांच्या जीवनामध्ये !
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हा जिजाऊंचा श्वास. हेच त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं. जिजाऊसाहेबांनी स्वराज्याचा स्वप्नपूर्ती सोहळा अर्थातच शिवराज्याभिषेक ‘याची देही याची डोळा’ पाहिला आणि कृतकृत्य भावनेने अखेरचा श्वास घेतला.
स्वार्थाचा लवलेशही न बाळगता जनहिताचे व्यापक उद्दिष्ट ठेवून प्राणपणाने आजन्म लढा देणाऱ्या जिजाऊंना एक नव्हे तर दोन पिढ्या घडवण्याचे श्रेय जाते. छत्रपती संभाजी महाराज यांनादेखील त्यांनी आपल्या मुशीत घडवले, म्हणूनच महाराष्ट्राला दुसरे छत्रपतीही तितकेच पराक्रमी मिळाले. दोन पिढ्या घडवण्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी धाडस, सन्मार्गावर चालणे आणि मूल्यांची शिदोरी जिजाऊ ठेवून गेल्या आहेत. या माउलींचे आपल्यावर असलेले ऋण फेडणे केवळ अशक्यच!
लहान मुलांचे स्वतःचे असे एक कल्पनाविश्व असते. गोष्टी म्हणजे मुलांसाठी अद्भुतरम्य कल्पनांची मालिकाच जणू ! त्यांच्या स्वप्नवत कल्पना त्यांना गोष्टींतून जागोजागी दिसतात. एखादी सवय, सल्ला, मार्गदर्शन उपदेश करून सांगण्यापेक्षा गोष्टीरूप सांगितला तर ते चटकन आत्मसात करतात. म्हणूनच मुलांच्या संस्कारक्षम वयात योग्य त्या गोष्टींची शिदोरी त्यांना मिळणे फार आवश्यक असते.
मुलांना चांगले-वाईट, योग्य-अयोग्यतेचे धडे गोष्टींतून मिळत असतात. गोष्टींमध्ये राक्षस, चेटकीण, जादूगार, प्राणी आणि प्रेमळ राजा-राणीसुद्धा असतात. गोष्टींमधील काही पात्रं सगळ्यांच्या भल्याचा विचार करतात; तर दुष्ट प्रवृत्तीची पात्रं विनाशक विचार आणि कृती करत असतात. मुलं त्या गोष्टी प्रत्यक्ष जगतात. या गोष्टींतील पराक्रमांपासून मुलांना प्रेरणा मिळेल. तसेच त्यांच्यावर मनोरंजनातून चांगुलपणाचे, व्यवहार्य ज्ञानवाढीचे संस्कार होतील.
Reviews
There are no reviews yet.