Rajmata Jijau | The Power of Your Subconscious Mind

Description

एका अशक्यप्राय, खडतर स्वप्नासाठी आपलं सबंध आयुष्य वाहून घ्यावं आणि शेवटी स्वप्नपूर्ती झाल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घ्यावा, ही तशी कविकल्पना वाटते; पण ही वस्तुस्थिती शत-प्रतिशत घडली आहे, स्वराज्यसारथी जिजाऊसाहेबांच्या जीवनामध्ये !
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हा जिजाऊंचा श्वास. हेच त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं. जिजाऊसाहेबांनी स्वराज्याचा स्वप्नपूर्ती सोहळा अर्थातच शिवराज्याभिषेक ‘याची देही याची डोळा’ पाहिला आणि कृतकृत्य भावनेने अखेरचा श्वास घेतला.
स्वार्थाचा लवलेशही न बाळगता जनहिताचे व्यापक उद्दिष्ट ठेवून प्राणपणाने आजन्म लढा देणाऱ्या जिजाऊंना एक नव्हे तर दोन पिढ्या घडवण्याचे श्रेय जाते. छत्रपती संभाजी महाराज यांनादेखील त्यांनी आपल्या मुशीत घडवले, म्हणूनच महाराष्ट्राला दुसरे छत्रपतीही तितकेच पराक्रमी मिळाले. दोन पिढ्या घडवण्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी धाडस, सन्मार्गावर चालणे आणि मूल्यांची शिदोरी जिजाऊ ठेवून गेल्या आहेत. या माउलींचे आपल्यावर असलेले ऋण फेडणे केवळ अशक्यच!

तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक
तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे.
• आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता. ,br> • प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता.
• हवी असलेली संपत्ती मिळवू शकता.
• आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता.
• तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता.
• भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता.
• ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता.
या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Rajmata Jijau | The Power of Your Subconscious Mind”

Your email address will not be published. Required fields are marked *