Description
आठ वर्षांची तिसरीतली साची. ती आजोबांना म्हणाली, “मी गोष्ट सांगते.
तुम्ही लिहून घ्या.” ती गोष्ट सांगू लागली. आजोबा लेखनिक झाले.
२०२१ साली तिने पाच गोष्टी सांगितल्या. लेखनिक आजोबा कौतुकाने लिहीत गेले.
एकदा आजोबांनी लिहिताना तिचा एक शब्द बदलला. साची पटकन म्हणाली, “मी सांगितलेला शब्द बदलू नका.
”आजोबांनी तिचा आदेश पाळला. २०२२ साली चौथ्या वर्गात तिने पुन्हा पाच गोष्टी लिहिल्या.
साचीच्या अशा या दहा गोष्टी. ग्रंथांशी मैत्री अन् वाचन-लेखन संस्कारांचा वारसा लाभलेल्या साचीच्या गोष्टींतून एक प्रकारच्या नीतिकथाच पुढं आल्यात. लेखन संस्कारांचे स्वप्न पाहिलेल्या तिसऱ्या पिढीतील या निरागस लेखिकेची ही सुरुवात आहे.
या अगोदर साचीने गोष्टींचे व्हिडिओ केले आहेत. आकाशवाणी केंद्रात काही गोष्टी सांगत धीटपणे मुलाखत दिली होती. ग्रंथप्रेमातून ज्ञान- विज्ञानाची पताका खांद्यावर घेऊ पाहणारी ही बाललेखिका ! तिच्या कथा म्हणजे उद्याच्या लेखिकेच्या पाऊलखुणाच आहेत.
बालकांवर वाचन-लेखनाचे संस्कार करणे, ही आजची गरज आहे. पालकांनी सर्जनशीलतेचे हे कर्तव्य सांभाळले, तर घरोघरी साचीसारखे बाललेखक वाचन-लेखनाची सुरुवात करू शकतील. ‘साचीच्या गोष्टी’ ही त्याची सुरुवात आहे.”
– धारा भांड – मालुंजकर
Reviews
There are no reviews yet.