Description
जो त्या मूळ स्त्रोताला पाहू शकतो’… बुद्धाचं मोठं अद्भुत वचन आहे. ‘तो अमानुषी रती प्राप्त करतो.’ तो अशा संभोगाप्रत पोचतो, जो मनुष्यतेच्या पैल आहे.
यालाच मी ‘संभोगातून समाधीकडे’ म्हटलं आहे. त्यालाच बुद्ध अमानुषी रती असं म्हणतो.
एक रती आहे माणसाची, स्त्री आणि पुरुषाची. क्षणभर सुख मिळतं. खरंच मिळतं की केवळ आभास असतो. दुसरी रती आहे. जेव्हा तुमची चेतना आपल्या मूळ स्त्रोतात जाऊन मिळते. तुम्ही स्वतःलाच निकट करता.
एक रती आहे दुसऱ्याशी मिलनाची, एक रती आहे स्वतःशीच मिलनाची. जेव्हा तुम्ही स्वतःशीच मिलन साधता, तो क्षण महाआनंदाचा असतो, तीच समाधी असते. संभोगात समाधीची झलक आहे; समाधीत संभोगाचं पूर्णत्व आहे.
– ओशो
या जगात स्वतःपलीकडे कशाचीच प्राप्ती खरी नव्हे. हे लक्षात ठेवा. जे स्वतःला शोधतात, त्यांनाच खरी प्राप्ती होते आणि जे इतरही काही शोधीत राहतात, त्यांच्या हाती शेवटी अपयश आणि दुःखच येते. वासनेच्या मागे धावणारे लोक नष्ट झाले आहेत, नष्ट होत आहेत आणि नष्ट होतील.
तो मार्ग आत्मनाशाचा होय.
वासनेची तृप्ती कधीच होत नाही. तिच्या मागे जितके धावावे, तितकी अतृप्ती वाढतच जाते. जेव्हा व्यक्ती मागे वळून पाहते आणि स्वतःत प्रवेश करते, तेव्हाच ती वासनेतून मुक्त होऊ शकते.
Reviews
There are no reviews yet.