fbpx

Sanskrutik Bharatatil Shreshtha Lokakatha | सांस्कृतिक भारतातील श्रेष्ठ लोककथा

₹300

288Pages
AUTHOR :- Ramesh Patange
ISBN :- 9789352201471
Order On Whatsapp

Share On :

Description

दक्षिण आशियातील ब्रह्मदेश, थायलंड, लाओस, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया आणि कोरिया या देशांतील निवडक लोककथा या पुस्तकात आहेत. या सर्व देशांत भारतीय संस्कृतीचा हजारो वर्षांपासून प्रसार झालेला आहे. या प्रदेशाला ‘बृहत् भारत’ असेही म्हणतात किंवा आजच्या भाषेत आपण त्याला ‘विस्तारित भारत’ असेही म्हणू शकतो. सर्व दक्षिण आशियातील देशांत भारतीय संस्कृती व भारतीय जीवनमूल्यांचा फार खोलवरचा प्रभाव आहे.
या सर्व देशांची लोकसंस्कृती अतिशय समृद्ध आहे. इथे लोककथांचे प्रचंड भांडार उपलब्ध आहे. या पुस्तकात प्रत्येक देशाच्या दहा कथा निवडताना ज्या कथांतून भारतीय जीवनमूल्यांचे दर्शन घडेल अशा कथा निवडल्या आहेत. या कथांतून भावासाठी बलिदान देणारी बहीण, आईची रक्षा करणारा वाघ, एकनिष्ठ पत्नी, एकनिष्ठ पती, कर्तव्यदक्ष राजा, गुंतागुंतीच्या प्रकरणात न्याय करणारा न्यायाधीश, मधाच्या एका थेंबासाठी राज्य कसे गेले, अशा अनेक विषयांवरच्या कथा वाचायला मिळतात. यातील प्रत्येक कथा आपल्याला भारतीय जीवनमूल्यांचे दर्शन घडवील आणि त्या देशांचे आपल्या देशाशी नाते आहे हे लक्षात येईल.
यातील कथा या सर्व देशांना भारतीयांशी जैविकरीत्या जोडणाऱ्या आहेत. हे सर्व देश म्हणजे आपल्या संस्कृतीचा विस्तार आहेत.

Additional information

About Author

श्री. रमेश पतंगे
• शिक्षण : एम.ए. (राज्यशास्त्र, अर्थशास्त्र)
• सा. विवेकचे भूतपूर्व संपादक मा. श्री. रमेश पतंगे बालपणापासून
संघ स्वयंसेवक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या.
• आज महाराष्ट्रात ते ज्येष्ठ विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारे विपुल ग्रंथलेखन त्यांनी केलेले आहे. त्यात ‘समरसता', 'संघर्ष महामानवाचा', 'बहुस्पर्शी विवेकानंद', 'महामानव अब्राहम लिंकन', 'सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर' इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे.
• सामाजिक समरसता मंच, भटके-विमुक्त विकास परिषद, समरसता
साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक सदस्य आहेत.
• हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. हिंदुस्थान
प्रकाशन संस्थेचा सा. विवेक, हिंदी विवेक, शिल्पकार चरित्रकोश,
पुस्तक विभाग असा मोठा व्याप आहे.
मानसन्मान :
• पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते
पाञ्चजन्यचा नचिकेता पुरस्कार
• उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी उत्कर्ष मंडळ, पार्ले पुरस्कार
• स्नेहांजली पुरस्कार, पुणे
• पुणे मराठी ग्रंथालयातर्फे पुरस्कार

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sanskrutik Bharatatil Shreshtha Lokakatha | सांस्कृतिक भारतातील श्रेष्ठ लोककथा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat